हिंगोली सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी येथील सुभाष तनपुरे यांच्या घरामध्ये दगडाच्या मुर्त्या निघाले. तसेच त्यांच्या सहा महिन्याच्या मुलीच्या कपाळावर मळवट भरून येत असल्याने या ठिकाणी देवीने जन्म घेतल्याची अफवा सर्वत्र पसरली होती. त्यानुसार पोलिसांनी व अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या Superstition Eradication Committee सदस्यांनी लागलीच कापड सिंधी येथे धाव घेऊन या प्रकाराची माहिती घेतली. येथे दरबार न भरवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कुठं आता येथील दरबार कमी झाला आहे. तरी ही काही महिला येथे धाव घेतच आहेत. त्याना परत पाठवले जात आहे.
सुभाष तनपुरे यांच्या घरामध्ये जन्म घेतलेल्या सहा महिन्याच्या चिमुकलिच्या कपाळावर मळवट आणि हातावर देखील मळवट येऊ लागले. Superstition Eradication Committee याची माहिती विविध सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर पसरल्याने, या ठिकाणी भाविकांनी एकच गर्दी केली होती. Hingoli Police एवढेच काय तर घराबाहेर मंडप टाकून त्यामध्ये पूजा मांडली जात होती.
पोलिसांनी घेतली कापड सिंगी येथे धावसेनगावचे पोलीस निरीक्षक रंजीत भोईटे यांना हा प्रकार कळाल्यानंतर त्यांनी आपल्या सहकार्यासह कापड सिंधी येथे धाव घेतली, तर त्या ठिकाणी घराबाहेर मंडप टाकण्यात आलेला दिसून आला. काही महिला देखील पूजेसाठी आल्याचे पाहायला मिळाले. Superstitions In Hingoli त्यामुळे त्यांनी चिमुरडीच्या आई वडिलाला हा प्रकार बंद करण्यासाठी सूचना केल्या होत्या. तसेच येथे येणाऱ्या महिला देखील समजावून सांगत हा सर्व अंधश्रद्धेचा खेळ बंद करण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत. त्यामुळे येथे दर्शनासाठी आलेल्या महिलांना आल्या पावली परत परतावे लागले.