हिंगोली- पोलीस प्रशासनाच्यावतीने अवैध दारू, जुगार व अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या हायवावर कारवाई करण्यात आली आहे. एकाच दिवसात वेगवेगळ्या पाच ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापे टाकून वाहन आणि जुगाराचा मुद्देमाल जप्त करून गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार नांदेडहून डोंगरकडा मार्गे अवैध वाळूची वाहतूक करणारा एक टिप्पर थांबवून त्याची चोकशी केली असता, सदर टिप्परमध्ये विना रॉयल्टी रेतीची वाहतूक करीत असल्याचे उघड झाले. त्यानुसार टिप्पर जप्त करून चालक फुलाजी विश्वभंर कदम आणि मालक मधुकर अरुण ढगे या दोघांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
अवैध दारू आणि मटका जुगारवर छापा, एकाच दिवसात पाच ठिकाणी कारवाई! - actions against illegal liquor and sand
पोलीस प्रशासनाच्यावतीने अवैध दारू, जुगार व अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या हायवावर कारवाई करण्यात आली आहे. एकाच दिवसात वेगवेगळ्या पाच ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापे टाकून वाहन आणि जुगाराचा मुद्देमाल जप्त करून गुन्हे दाखल केले आहेत.
दुसऱ्या घटनेत दारूच्या 3 हजार 840 रुपये किंमतीच्या 48 बॉटल चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्याचे उघड झाले. याप्रकरणी दोघांवर आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर तिसऱ्या घटनेत हिंगोली तालुक्यातील खंडाळा येथे मारलेल्या छाप्यात नितीन अशोक नेतने याच्याकडून 2 हजार 690 रुपयांच्या 37 देशी दारुच्या बॉटल जप्त केल्या आहेत. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हिंगोली तालुक्यात देखील नरसी येथे 3840 रुपयांच्या 48 देशी दारूच्या बाटल्या जप्त करून लक्ष्मण माणिक पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ओंढा व हट्टा हद्दीत दोन आरोपी मटका जुगार खेळताना आढळले आहेत. त्यांच्याकडून 12 हजात 610 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या पाचही कारवाईत एकूण 25 लाख 48 हजार 250 रुपये इतका मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे यांच्या पथकाने केली आहे.