हिंगोली- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पालिकेने किराणा दुकान, भाजीपाला, फळ विक्रेत्यासाठी जागेचे आयोजन करुन दिले आहे. मात्र, काही दुकानदार नियमांचे उल्लंघन करीत आहेत. त्यांच्यावर पालिकेने तिसऱ्यांदा कारवाई करुन हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये 12 जणांचा समावेश आहे.
लाॅकडाऊन: आता तरी नियम पाळा... 12 जणांवर गुन्हा दाखल
जिल्ह्यात पालिकेने किराणा दुकान, भाजीपाला, फळ विक्रेत्यसाठी जागेचे आयोजन करुन दिले आहे. मात्र, काही दुकानदार नियमांचे उल्लंघन करीत आहेत. त्यांच्यावर पालिकेने तिसऱ्यांदा कारवाई करुन हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा-#लाॅकडाऊन: वाहतूक ठप्प..! राज्यातील वाहनचालकांवर उपासमारीची वेळ
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यात प्रशासन, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, नगरपालिका प्रशासन जीव ओतून काम करीत आहे. पालिका शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मोठे प्रयत्न करीत आहे. त्या-त्या कॉलनीतील नागरिकांना जवळच भाजीपाली मिळाला पाहिजे असे नियोजन केले जात आहे. या भाजीपाला बाजारात सोशल डिस्टन्सची पायमल्ली होत असली तरी रस्त्यावरुन बाजार मोकळ्या मैदानात हलविल्याने अपघाताच्या घटना टाळण्यासाठी मदत झाली आहे. ताब्यात घेतलेले मोकळे मैदान पालिका स्वच्छ करुन देत आहे. मात्र, काही भाजीपाला विक्रेते, नियोजित ठिकाणी दुकान सुरू न करता भलतीकडेच दुकान थाटत आहेत. त्यामुळे अशा बेशिस्त 12 दुकानांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मो.हफिस रतन बागवान (फळविक्रेता), शे.अजीम शे मौला बागवान (भाजी विक्रेता), मुद्दसिर इब्राहिम बागवान मुस्ताक, म मकसूद बागवान, उतामेर हफिस बागवान, तुफेल मो रज्जाक बागवान, म हनिफ म शमी बागवान, म. हफीम म. बशीर बागवान, म्यांद आजम बागवान (सर्व फळविक्रेते), शे अखिल शे युनूस बागवान (भाजी विक्रेता), एजाज बाबू गॊरी (अंडा शॉप), शे साजीत (नॅशनल चिकन सेंटर) यांच्यावर गुन्ह दाखल झाले आहेत. या कारवाईने खळबळ जरी उडाली असली तरी दुकानदारांची अजूनही वाईट सवय काही केल्या जात नसल्याचे विदारक चित्र सध्या बाजार पेठेत दिसून येत आहे. मात्र, आता चुकीला माफी नाही हा फंडा पालिका राबवत आहे.