महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नगरपालिकेने बंद पाडला बाटली बंद पाणी उद्योग; लाखो रुपयांचे प्लास्टिक जप्त

संपूर्ण महाराष्ट्रात सिंगल युज प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्या अनुषंगाने हिंगोली नगपालिकेने शहरात प्लास्टिक बंदी मोहीम राबवली आहे. या मोहीमेदरम्यान अवैध नळजोडणी घेऊन त्यावर चालणारा पाण्याचा कारखाना नगरपालिकेने बंद पाडला. या कारवाईत लाखो रुपयांचे प्लास्टिक जप्त करण्यात आले.

Plastic
लाखो रुपयांचे प्लास्टिक जप्त

By

Published : Feb 15, 2020, 5:30 PM IST

हिंगोली - अवैध नळजोडणी घेऊन त्यावर चालवण्यात येणारा बाटली बंद पाणी निर्मितीचा उद्योग नगरपालिकेने बंद पाडला. शहरातील हनुमान नगर भागात हा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती नगरपालिकेच्या पथकाला मिळाली होती. या कारवाईत लाखो रुपयांचे प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. नगरपालिकेने तोतया ग्राहक पाठवून या कारखान्याची शहानिशा केली होती.

नगरपालिकेने बंद पाडला पाण्याचा कारखाना

संपूर्ण महाराष्ट्रात सिंगल युज प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्या अनुषंगाने हिंगोली नगरपालिकेच्यावतीने शहरात प्लास्टिक बंदी मोहीम राबवली जात आहे. शहरातील हनुमाननगर भागात 'गुरू प्रसाद वॉटर प्लॅन्ट' हा बाटली बंद पाण्याचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती हिंगोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांना मिळाली. त्यानंतर पाटील यांनी याठिकाणी एक तोतया ग्राहक पाठवून याबाबत शहानिशा केली.

हेही वाचा -'ईटीव्ही भारत' इम्पॅक्ट : राज्यमंत्री बच्चू कडूंनी उचलला 'वीटभट्टी' शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 60 हजारांचा खर्च

त्यानंतर नगरपालिकेच्या एका विशेष पथकाने या कारखान्यावर छापा टाकला. या कारवाईमध्ये पाण्याच्या पिशव्यांसह प्लास्टिकच्या बाटल्यांसाठी वापरण्यात येणारे स्टिकरचे रोलही जप्त केले. याची किंमत सुमारे दोन लाख रुपये आहे. कारखान्यातील नळ जोडणीचीही चौकशी सुरू आहे.

नगरपालिकेच्यावतीने सुरू असलेल्या छापा सत्रामुळे शहरातील प्लास्टिक व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. हिंगोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details