हिंगोली - कळमनुरी तालुक्यातील कृष्णापूर नंतर आता विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याच मूळ गावी वृक्ष लावगडीचे तीनतेरा झाले आहेत. लागवडीसाठी आणलेली रोपे एका बंद खोलीत ठेऊन आयुक्त येण्याआधीच रातोरात त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. यावरून मराठवाड्यात वृक्षरोपण करण्याचे आदेश देणाऱ्या विभागीय आयुक्तांच्या गावातच संबंधित योजनेला सुरुंग लागल्याचे चित्र आहे.
यावर्षी 33 कोटी वृक्ष लावगड करण्याचा संकल्प राज्य शासनाने केला होता. संबंधित योजनेअंतर्गत जिल्ह्यात 27 लाख वृक्षांची लावगड करण्यात आली. शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयानेही या वृक्षलागवडीत सहभाग नोंदवला. तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीला 3 हजार 300 वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार काही ग्रामपंचायतींनी वृक्ष लावगड केली; मात्र कळमनुरी तालुक्यातील कृष्णापुर येथील ग्रामपंचायतीने वृक्ष लावगड न करता रोपे फेकून दिल्याचे आढळले. होते.