हिंगोली- जिल्ह्यात अजूनही वन्य प्राण्यांचे मानवावरील हल्ले वाढतच चालले आहेत. आज (मंगळवार) सामाजिक वनीकरण असोलातर्फे औंढा नागनाथ तालुक्यातील लाख या माळरानावर 33 कोटी वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदत असताना अचानक रानडुकराने मायलेकावर हल्ला केला. यात दोघेही जखमी झाले आहेत. ही घटना सकाळी ११ च्या सुमारास घडली.
हिंगोलीत रानडुकराच्या हल्ल्यात माल-लेक जखमी, उपचार सुरू - रानडुकर
आशाबाई धनवे व सिद्धनाथ धनवे असे जखमी माय लेकाचे नावे आहेत. हे दोघे माळरानावर खड्डे खोदण्याचे काम करत होते. मात्र, अचानक रानडुकराने हल्ला केल्यामुळे दोघेही जखमी झाले.
आशाबाई धनवे व सिद्धनाथ धनवे असे जखमी माय लेकाचे नावे आहेत. हे दोघे माळरानावर खड्डे खोदण्याचे काम करत होते. मात्र, अचानक रानडुकराने हल्ला केल्यामुळे दोघेही जखमी झाले. मुलाने ही बाब वडिलांना सांगितली. दोघांनाही औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयांत उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांच्यावर डॉ. ऐश्वर्या देशमुख यांनी प्राथमिक उपचार केले आहेत. रानडुकराच्या हल्ल्यामुळे मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रानडुकराच्या हल्ल्यात जखमीं झालेल्या माय लेकाला वनविभागाने आर्थिक मदत देण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. तसेच सामाजिक वनीकरण असोलातर्फे लाखच्यावतीने वनखात्यांना जखमी मायलेक हे रानडुकराच्या हल्ल्यातच जखमी झाल्याचे नमूद करत एक पत्रही दिले आहे. आता वनविभाग किती लवकर या मायलेकाना मदत करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे