हिंगोली-कळमनुरी येथे आठवडी बाजारात शनिवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्याने उडालेला पत्रा लागून जखमी झालेल्या एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विठ्ठल नेमाजी खंदारे (65) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
शनिवारी सायंकाळच्या सुमारास कळमनुरीत अचानक वादळी वारे सुटले. यामध्ये अनेक घरावरील पत्रे उडाले आहेत. तर रस्त्याच्या कडेला असलेल्या अनेक झोपड्यादेखील उडून गेल्या. अण्णाभाऊ साठेनगर भागातील विठ्ठल नेमाजी खंदारे यांच्या घरावरील पत्रे उडाले त्यातील पत्रा लागून ते यामध्ये गंभीर जखमी झाले होते.