हिंगोली - कोरोना विषाणूच्या विरोधात सर्व भारतीय एकजुटीने लढा देत असल्याचे दाखवत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री ९ पासून पुढे ९ मिनीटे दिवे लावण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यात नऊ वाजून नऊ मिनिटापर्यंत लाईट विझवून दिवे लावत नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
हिंगोली उजळली दिव्यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद - कोरोना अपडेट्स
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला हिंगोली येथेही नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील विद्युत उपकरणं, लाईट बंद करत दिवे लावून कोरोनाच्या लढाईत आम्ही एकजूट आहोत, हे दाखवून दिलं.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला देशातील जनतेने भरभरून प्रतिसाद दिला. हिंगोली येथेही नागरिकांनी ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील विद्युत उपकरणं, लाईट बंद करत दिवे लावून कोरोनाच्या लढाईत आम्ही एकजूट आहोत हे दाखवून दिलं. सोबतच काही कुटुंबानी तर परातीही वाजवल्या. शिवाय फटाक्यांचीही आतिषबाजी करण्यात आल्याचेही पहावयास मिळाले. एकंदरीतच पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनाला जिल्ह्यातील नागरिकांनी दिवे लावून प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे सव्वा नऊ वाजेपर्यंत फटाक्यांची आतिषबाजी सुरुच होती.