हिंगोली - जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेसह मद्य विक्रीचे दुकाने सुरू करण्यात आले. मात्र, मद्यप्रेमींनी खरेदीसाठी गर्दी केल्याने एकच गोंधळ निर्माण झाला. कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने शेवटी दुकाने बंद करण्यात आला. त्यामुळे सकाळपासून रांगेत थांबवलेल्या मद्यप्रेमींचा चांगलाच हिरमोड झाल्याचे पाहायला मिळाले.
हिंगोलीत दारूच्या दुकानासमोर मद्यप्रेमींची गर्दी, गोंधळ झाल्याने दुकाने बंद करण्याची वेळ
विशेष म्हणजे ५० दिवसानंतर दारूची दुकाने सुरू झाली तरीही मद्यप्रेमींनी गर्दी केली नव्हती. मात्र, एक दिवसाआड दुकाने उघडणे सुरू झाल्यावर मद्यप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. याठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. मात्र, कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दुकाने बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
हिंगोलीमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने बरे होत आहेत. एकूण ९१ कोरोनाबाधितांपैकी ८१ रुग्ण बरे झाले असून जिल्ह्यात फक्त १० कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यापैकी ९ रुग्णांवर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षामध्ये फक्त एकाच कोरोनाबाधित रुग्णावर उपचार सुरू आहे. हिंगोलीकरांसाठी ही बाब दिलासादायक आहे. त्यामुळे जिल्ह्यात एक दिवसाआड बाजारपेठ सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, नागरिक गर्दी करताना दिसून येत आहेत.
विशेष म्हणजे ५० दिवसानंतर दारूची दुकाने सुरू झाली तरीही मद्यप्रेमींनी गर्दी केली नव्हती. मात्र, एक दिवसाआड दुकाने उघडणे सुरू झाल्यावर मद्यप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. याठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. मात्र, कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुकाने बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पोनी नेव्हल यांनी दुकानाच्या किल्ल्या ताब्यात घेतल्या. त्यामुळे काहींनी काढता पाय घेतला, तर काहीजण दुकाने उघडण्याची प्रतीक्षा करत उन्हात ताटकळत बसले होते.