हिंगोली- जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील जामदया जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे पालकांनी आपले पाल्य शाळेत पाठवण्यास विरोध करीत शाळेवर बहिष्कार टाकला. तसेच सर्व पालक शाळेच्या प्रांगणात दिवसभर ताटकळत बसले होते.
हिंगोलीत जिल्हा परिषद शाळेवर पालकांचा बहिष्कार; शाळा दुरुस्त करण्याची मागणी - सेनगाव
जामदया जिल्हा परिषद शाळेची दुरुस्ती करण्याबाबत अनेकदार शिक्षण विभागाकडे निवेदने सादर केली होती. मात्र, अद्यापही त्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे पडक्या खोलीतच शिक्षण घेण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आलेली आहे. त्यामुळे पालकांनी आपले पाल्य शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
जामदया जिल्हा परिषद शाळेची दुरुस्ती करण्याबाबत अनेकदार शिक्षण विभागाकडे निवेदने सादर केली होती. मात्र, अद्यापही त्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे पडक्या खोलीतच शिक्षण घेण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आलेली आहे. त्यामुळे पालकांनी आपले पाल्य शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. शाळेची अशीच परिस्थिती राहिल्यास सर्वजण शाळेतून मुले काढणार असल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. दिवसभर शाळेत ताटकळत बसूनही या पालकांची कुणीही भेट घेतलेली नाही. त्यामुळे पालक अधिकच संतप्त झाले होते.
शिक्षण विभाग शाळा दुरुस्तीचा मुद्दा गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे शाळा दुरुस्ती होऊन मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचे पाल्य शाळेत पाठवणार नसल्याचा पवित्रा जामदया येथील पालकांनी घेतला आहे. आता शिक्षण विभाग या पालकांच्या मागण्या पूर्ण करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.