हिंगोली -जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावली. सेनगाव तालुक्यातील देऊळगाव जहागीर येथे वीज पडून बैलाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास घडली. ऐन रब्बी हंगामातील पेरणीच्या तोंडावर बैल दगावल्याने शेतकऱ्याचे ४० ते ५० हजार रूपाचे नुकसान झाले आहे.
देऊळगाव जहागीर येथील शिवाजी सरगड नेहमी प्रमाणे झाडाला बैल बांधून शेतात झेंडूची फुले तोडण्याचे काम करीत होते. यावेळी अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. दरम्यान, झाडावर वीज पडली असता झाडाखाली बांधलेला बैल दगावला. तर दुसरा बैल थोडक्यात वाचला.