महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीत अवयदान जनजागृती फेरी; शहरातील अनेक महिलांनी घेतला उत्स्फूर्त सहभाग - महिला डॉक्टर

अवयवदान हे जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचे आहे. मृत शरीरावर अत्यंसंस्कार झाल्यानंतर ते शरीर नष्ट होते. मात्र, याच शरिराचे अवयदान केल्यास हेच शरीर अनेकांसाठी जीवनदान ठरु शकते. यासंदर्भात शहरात जनजागृती फेरी काढण्यात आली.

अवयदान जनजागृती फेरी

By

Published : Sep 1, 2019, 7:17 PM IST

हिंगोली - प्रत्येक व्यक्तीसाठी शरीर हे खूप अमूल्य असते. मात्र, प्राणज्योत मालवल्यानंतर हेच शरीर इतरांसाठी जीवनदान ठरू शकते. त्यासाठी प्रत्येकाने अवयवदान केले पाहिजे. या संदर्भात जनजागृती व्हावी या हेतूने, हिंगोली येथील अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन, शाखा हिंगोली आणि नेत्रदान समितीच्या वतीने शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली.

हिंगोलीत अवयदान जनजागृती फेरी
या रॅलीमध्ये हिंगोली शहरातील महिला डॉक्टर, भारतीय मारवाडी महिला संमेलनाच्या सदस्य आणि शहरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. अवयवदान हे जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचे आहे. मृत शरीरावर अत्यंसंस्कार झाल्यानंतर ते शरीर नष्ट होते. मात्र याच शरीराचे अवयदान केल्यास हेच शरीर अनेकांसाठी जीवदान ठरु शकते.


यामुळे आपले अमूल्य अवयव हे जाळून नष्ट करण्यापेक्षा कोणाच्या तरी जीवनाला सावरण्यासाठी दान केले पाहिजे. हाच एकमेव संदेश देण्यासाठी सर्व महिला डॉक्टर, मारवाडी महिला संघ आणि नेत्रदान संघटनेच्या वतीने ही रॅली काढण्यात आली होती. या जनजागृती मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळेल,अशी अपेक्षा यावेळी महिला डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details