हिंगोली- जिल्ह्यात ३ ते ४ दिवसांपासून उष्णतेची लाट पसरली आहे. जवळपास ४२ अंश एवढे तापमान असल्याने उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांचा मोठा खटाटोप सुरू आहे. अशातच घरात कुलर असेल आणि ते व्यवस्थित न हाताळल्यास जीव गमावू शकतो. असेच एकाला चालू कुलरमध्ये पाणी टाकणे जीवावर बेतले. शॉक लागलेली व्यक्ती काही क्षणात जमिनीवर कोसळून पडली. त्या व्यक्तीला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. ज्ञानेश्वर भाऊराव कोळपे (३५, रा. कळमनुरी) असे मृताचे नाव आहे.
हिंगोली जिल्ह्याचे तापमान ३ ते ४ दिवसांपासून ४२ अंशावर पोहोचले आहे. मे महिन्यात वाढणारा पारा एप्रिलमध्येच वाढत आहे. त्यामुळे उन्हापासून बचाव करण्यावरच सर्वाधिक जास्त भर आहे. असाच एक विश्वहिंदु परिषदेचा कार्यकर्ता दिवसभर आपले काम उरकून रात्री घरी गेला. घरात गेल्यानंतर लेकरं बाळ झोपलेले असताना काही प्रमाणात उकाडा जाणवत होता. त्यामुळे ज्ञानेश्वर कुलर जवळ गेला तर कुलरमध्ये पाणी कमी दिसले.