हिंगोली- पुणे येथून वसमतमध्ये आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आज हिंगोली प्रशासनाला प्राप्त झाला आहे. सदर व्यक्ती हा वसमत तालुक्यातील मुरुंबा येथील रहिवासी आहे. तो पुणे येथून परतताच त्याला वसमत येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. नव्याने आढळलेल्या रुग्णामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 229 झाला आहे. यातील 192 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
वसमतमध्ये आढळला नवा कोरोना रुग्ण, हिंगोलीतील बाधितांची संख्या 229 वर - वसमतमध्ये आढळला नवा कोरोना रुग्ण
वसमतमध्ये आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आज हिंगोली प्रशासनाला प्राप्त झाला आहे. सदर व्यक्ती हा वसमत तालुक्यातील मुरुंबा येथील रहिवासी आहे. तो पुणे येथून परतताच त्याला वसमत येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते.

नव्याने आढळलेल्या रुग्णामुळे गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्याच्या स्थितीमध्ये शेतकरी पेरणीला सुरुवात करत असतानाच नव्याने आढळलेल्या या रुग्णामुळे गाव सील करण्याची प्रक्रिया प्रशासनाच्यावतीने सुरू केली जात आहे. त्यामुळे, शेतकरीही अडचणीत सापडले आहेत. सध्या जिल्ह्यात 37 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आलेली आहे. यामध्ये वसमत येथील कोरोना केअर सेंटरमध्ये एकूण तीन रुग्ण तर कळमनुरी येथील सेंटरमध्ये 5 आणि येथीलच डेडीकेट हेल्थ सेंटर येथे एक रुग्ण दाखल होता. त्याला औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयामध्ये विशेष काळजी म्हणून दाखल करण्यात आलेले आहे.
हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात असलेल्या आयसोलेशन वार्डमध्ये एकूण 28 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्यावतीने गाव पातळीवर तयार करण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये आजपर्यंत 830 व्यक्तींना दाखल करण्यात आले आहे. यातील 723 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 545 व्यक्तींना घरी सोडले आहे. तर 285 व्यक्ती दाखल असून, 79 जणांचे अहवाल हे प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहेत. जिल्ह्यातील सर्व कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल झालेल्या 2197 व्यक्तींपैकी 2385 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.