हिंगोली- जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. बुधवारी वसमत येथे क्वारंटाईन केलेल्या तरुणाचा वैद्यकीय अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 16 झाली आहे. 15 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण असलेल्या जिल्ह्याची गणना रेड झोनमध्ये केली जाते. त्यामुळे हिंगोली जिल्हा आता रेड झोनमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे हिंगोलीकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
हेही वाचा-पश्चिम बंगालमध्ये 'रेड झोन' परिसरात जमावाचा पोलिसांवर हल्ला
कोरोनाच्या रुग्णात वाढ होत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच धर्तीवर हिंगोली येथेही दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढत आहे. प्रशासन खूपच गतिमान झाले आहे. जिल्ह्यात कोरोना संशयित रुग्णांची संख्या वाढत असून आज घडीला जिल्ह्यात 694 कोरोना संशयित होम क्वारंटाईन आहेत.
सेनगाव येथील होम क्वारंटाईन मधील एक पाच वर्षीय मुलगा तर वसमत येथील बार्शी येथून आलेल्या एका तरुणाचा अहवाल हा आज पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 16 वर पोहोचली आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्याने रेड झोनमध्ये पदार्पण केले आहे. मात्र, ज्या क्वारंटाईन सेंटर मधील रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने, तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे 17 रुग्ण झाले असून, त्यातील एकाला बरा झाल्यामुळे घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात 16 रुग्ण झाले आहेत तर एका कोरोना बाधित रुग्णाला रक्तदाबाचा त्रास होता. त्याची प्रकृती स्थिर होती, शिवाय कोणतेही गंभीर लक्षणे नव्हते मात्र विशेष काळजी म्हणून हा रुग्ण औरंगाबाद येथे हलविला आहे.