हिंगोली -शहरापासून काही अंतरावर असलेल्या बळसोंड भागातील रिलायंस पेट्रोल पंपाजवळ जेसीबी वाहून नेणाऱ्या कंटेनर खाली येऊन पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात त्याच्या खिशात राजू नामदेव इंगळे रा. खुशालनगर हिंगोली या नावाचे आधारकार्ड सापडले आहे.
हिंगोलीत जेसीबी वाहून नेणाऱ्या कंटेनरचा भीषण अपघात; एक ठार - हिंगोली अपघात बातम्या
हिंगोली जिल्ह्यामध्ये अजूनही अपघाताची मालिका सुरू असून आज पुन्हा एक भीषण अपघात झाला. यामध्ये जेसीबी वाहून नेणाऱ्या कंटेनर खाली येऊन पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला.
हिंगोली जिल्ह्यामध्ये अजूनही अपघाताची मालिका सुरूच आहे. आज पुन्हा एक असा भीषण अपघात झाला. यामध्ये एका पादचाऱ्याला त्याचा जीव गमवावा लागला. हा अपघात हिंगोली शहरापासून काही अंतरावर असलेल्या बळसोंड भागातील रिलायन्स पेट्रोल पंप याठिकाणी घडला. आज झालेल्या अपघातात मृताचा पाय हा धडापासून वेगळा झाला असून कंटेनर हा अंगावरून गेल्याने, शरीराचा पूर्ण चेंदामेंदा झाला आहे. घटना घडल्याचे चालकाच्या लक्षात येताच चालकाने ब्रेक दाबला. मात्र, वाहनाला गती असल्याने मृतदेह हा चार ते पाच फूट फरफटत गेला.
ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न
घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळीराम बंद खडके यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. त्याची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याच्या खिशामध्ये एक आधार कार्ड सापडले असून त्याच्यावर राजू इंगळे असे नाव आहे. अजूनही काही नावाचा पुरावा सापडतो काय, याचा पोलीस शोध घेत आहेत. घटनेचा पंचनामा सुरू असून, पोलिसांनी जेसीबी घेऊन जाणारा कंटेनर ताब्यात घेतला आहे. अजून या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.