हिंगोली - दोघेजण हसत खेळत गप्पा मारीत पिकाला पाणी देत होते, तर शेतात तुटून पडलेल्या विद्युत तारांवर लेकीचा पाय पडणार तोच पित्याने धावत येऊन तार हातात धरून बाजूला करण्याच्या प्रयत्नात त्यांना जोराचा शॉक लागला. यात शेतकरी जमिनीवर कोसळल्याची घटना 26 एप्रिल रोजी दुपारी 3 च्या सुमारास हट्टा येथे घडली. शेजाऱ्यांनी अन् मुलीच्या मदतीने संबंधित शेतकऱ्याला वसमत येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
लेकीला वाचविण्याच्या प्रयत्नात पित्याचा शॉक लागून मृत्यू - हिंगोली बातमी
तुकाराम मोरे रा. पिंपळदरी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मोरे अन् त्यांची मुलगी स्वर्णमाला (12) ही वसमत तालुक्यातील हट्टा येथे ऍड. वसीम सिद्दीकी यांच्या शेतात उसाच्या पिकाला पाणी देत होते. दरम्यान, दोघे बाप लेक पाणी देत असताना स्वर्णमालाचा पाय हा शेतात तुटून पडलेल्या विजेच्या तारांवर पडणार तोच वडील मोरे जोराने मुलीकडे धावून आले, अन् त्यांनी तार हातात धरून बाजुला करण्याचा प्रयत्न केला.
तुकाराम मोरे रा. पिंपळदरी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मोरे अन् त्यांची मुलगी स्वर्णमाला (12) ही वसमत तालुक्यातील हट्टा येथे ऍड. वसीम सिद्दीकी यांच्या शेतात उसाच्या पिकाला पाणी देत होते. दरम्यान, दोघे बाप लेक पाणी देत असताना स्वर्णमालाचा पाय हा शेतात तुटून पडलेल्या विजेच्या तारांवर पडणार तोच वडील मोरे जोराने मुलीकडे धावून आले, अन् त्यांनी तार हातात धरून बाजुला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही सेकंदात मोरे हे जमिनीवर कोसळले. त्यांना शॉक लागल्याचे लक्षात येताच मुलीने जोरात आरडाओरड केली. त्यामुळे शेजारच्या शेतात काम करीत असलेले बाळू उत्तम रिठे हे धावून आले, त्यांनी मोरे यांना पकडण्याचा प्रयत्न केला तर तेदेखील जखमी झाले. सर्वप्रथम घटनेची माहिती फोनवरून हट्टा येथील विद्युत वितरण कार्यालयाला कळविली. त्यांनी विद्युत पुरवठा बंद केला. आजुबाजूला काम करीत असलेल्या शेतकऱ्यांनी या तिघांना हट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.
डॉक्टरांनी तपासून मोरे यांना मृत घोषित केले तर स्वर्णमाला अन् बाळू रिठे यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी येथे हलविले आहे. घटनेने गावात शोककळा पसरली असून मला वाचविण्यासाठी माझ्या वडिलांने स्वतःचा जीव गमावल्याची खंत मुलगी स्वर्णमाला व्यक्त करीत आहे. याप्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.