हिंगोली - जिल्ह्यात तीन ते चार दिवसांपासून पाऊस विजेच्या कडकटासह हजेरी लावत आहे. दोन दिवसांपूर्वी वीज पडून एक बैल दगावला होता तर शनिवारी कळमनुरी तालुक्यात वीज पडून एक जण जागीच ठार झाल्याची घटना सायंकाळी 6 च्या सुमारास घडली. सचिन उत्तम लांडगे (वय-35, रा. पुयना ता. कळमनुरी) असे मृताचे नाव आहे.
हिंगोलीत वीज पडून एकाचा मृत्यू; झाडाखाली जाताच घडली घटना - lightning strike
हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या तीन ते चार दिवसांपासून जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे शेतकरी शेतातील कामे करून घेण्यासह खरिपाच्या पेरणीसाठी बी-बियाणांची खरेदी करीत आहेत.
हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या तीन ते चार दिवसांपासून जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे शेतकरी शेतातील कामे करून घेण्यासह खरिपाच्या पेरणीसाठी बी-बियाणांची खरेदी करीत आहेत. अशातच लांडगे हे कळमनुरी येथे काही कामानिमित्त आले होते, काम आटोपून ते आपल्या घराकडे जात असताना, जोरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पावसापासून बचाव करण्यासाठी त्यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाचा सहारा घेतला. ते झाडाखाली थांबले तोच काही क्षणात त्या झाडावर वीज कोसळून लांडगे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. यापूर्वी सेनगाव तालुक्यातील गीलोरी येथे एक बैल दगावल्याची घटना मंगळवारी घडली होती. आता मात्र अधून मधून पाऊस हजेरी लावत आहे त्यामुळे शक्यतो ओर कुणीही पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाचा सहारा घेणे टाळणे गरजेचे आहे.