महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊन : वडिलांनाही घेता आले नाही अंत्यदर्शन... मुलाचा वीज पडून मृत्यू - हिंगोली पाऊस बातमी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देवकर यांना घराकडे परतता आले नाही. त्यामुळे घनश्याम घरची जबाबदारी पेलत होता. तो नेहमीप्रमाणे शेतातील आखाड्यावर बांधलेल्या बैलांना चारापाणी करण्यासाठी गेला होता. चारापाणी करुन घराकडे येत असताना, अर्ध्या रस्त्यातच वीज पडली अन् घनश्यामचा जागीच मृत्यू झाला.

लॉकडाऊनमुळे वडीलाला नाही घेता आले पोटच्या गोळ्याचे अंत्यदर्शन
लॉकडाऊनमुळे वडीलाला नाही घेता आले पोटच्या गोळ्याचे अंत्यदर्शन

By

Published : Apr 16, 2020, 9:30 AM IST

हिंगोली - तालुक्यातील बासंबा येथे वीज पडून एका 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना 14 एप्रिलला सायंकाळी पाच वाजता घडली होती. बाहेरगावी कामानिमित्त गेलेल्या वडिलांच्या प्रतीक्षेत एक दिवस मुलाचा मृतदेह ठेवण्यात आला होता. मात्र, लॉकडाऊनमुळे दुसऱ्या दिवशीही वडील पोहचू न शकल्याने वडिलांच्या अनुपस्थितीतच अंत्यसंस्कार उरकण्याची वेळ नातेवाईकांवर येऊन ठेपली. तर, कोरोनामुळे वडिलाला आपल्या मुलाचे शेवटचे दर्शनदेखील घेता आले नाही. घनश्याम देवकर (17) असे मृत मुलाचे नाव आहे.

घनश्यामच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने, वडील कोल्हापूर येथे ऊस तोडीचे काम करण्यासाठी गेले आहेत. काम बंद झाले असले तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांना घराकडे येता आले नाही. त्यामुळे घनश्याम घरची जबाबदारी पेलत होता. तो नेहमीप्रमाणे शेतातील आखाड्यावर बांधलेल्या बैलांना चारापाणी करण्यासाठी गेला होता. चारापाणी करुन घराकडे येत असताना, अर्ध्या रस्त्यातच वीज पडली अन् घनश्यामचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती बासंबा पोलीस ठाण्याला कळताच पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करुन, मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णलायात पाठवण्यात आला. वडिलांच्या प्रतीक्षेत अंत्यविधी दुसऱ्या दिवशी ठेवण्यात आला होता. मात्र, लॉकडाऊनमुळे वडिलाला अंत्यविधीसाठी येणेदेखील शक्य झाले नाही. या घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details