हिंगोली- तालुक्यातील लोहगाव शिवारात क्रेशर मशिनच्या साहाय्याने बनविण्यात येत असलेल्या मातीच्या खड्यात पडून एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृताच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हिंगोलीत खडीच्या ढिगाऱ्याखाली गुदमरून एकाचा मृत्यू - one died in hingoli
लोहगाव शिवारात क्रेशर मशिनच्या साहाय्याने बनविण्यात येत असलेल्या मातीच्या खड्यात काम करत असताना दिपक रामप्यारे हरजन या परराज्यातून आलेल्या कामगाराच मृत्यू झाला. हुप्परमध्ये वाकून पाहिले असता त्याचा पाय घसरला आणि तोल जाऊन खड्यात पडला. यातच वरून त्याच्या अंगावर बारिक खडी, डस्ट पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे कामगारांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
दिपक रामप्यारे हरजन (वय, ३२) रा. करवज जि. चंखले (उ. प्रदेश) असे मृताचे नाव आहे. दिपक हा गेल्या अनेक वर्षांपासून लोहगाव येथील क्रेशरवर कामाला होता. तो नेहमीप्रमाणे काम करत असताना त्याने हुप्परमध्ये वाकून पाहिले असता त्याचा पाय घसरला आणि तो जाऊन खड्यात पडला. यातच वरून त्याच्या अंगावर बारिक खडी, डस्ट पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे मात्र कामगारांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. या क्रेशर मशिनवर काम करण्यासाठी परराज्यातून मोठ्या प्रमाणात कामगार दाखल झाले आहेत. रात्रंदिवस राबणाऱ्या कामगारांमधीलच एक असलेल्या दिपकचा मृत्यू झाल्याने कामगारांवर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा-हिंगोली: प्रवाशाला खुर्चीवर बस म्हणणे वाहकास भोवले