महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुलावरून दुचाकी कोसळून अपघात; एक ठार, दोघे गंभीर जखमी - हिंगोली दुचाकी अपघात

ऋतिक वाघमारे,वैभव बोरकर व सुरज दळवे हे तीन मित्र कळमनुरी तालुक्यातील नांदापूरमधील यात्रा पाहुन रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास दुचाकी वरून हिंगोलीकडे निघाले होते. वारंगा मसाई मार्गावरावरुन जाताना व्यवस्थीत रस्ता न दिसल्याने, दुचाकी पुलावरून जोरात खाली कोसळली. या अपघातात ऋतिकचा जागीच मृत्यू झाला. तर वैभव आणि सूरज गंभीर जखमी झाले आहेत.

one dead and two injured in accident  at hingoli
पुलावरून दुचाकी खाली कोसळुन अपघात; एक ठार, दोघे गंभीर जखमी

By

Published : Jan 9, 2020, 2:55 AM IST

हिंगोली - जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघाताच्या मालिका सुरूच आहे. पुन्हा एकदा कळमनुरी ते वारंगा मसाई मार्गे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावरून दुचाकी पुलावरून खाली कोसळून एक जण जागीच ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर मनुरीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.

ऋतिक वाघमारे (वय १७) मृत तरुणाचे नाव आहे. तर, वैभव बोरकर आणि सुरज दळवे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिघे जण कळमनुरी तालुक्यातील नांदापूरमधील यात्रेवरून रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास दुचाकी वरून हिंगोलीकडे निघाले होते. वारंगा मसाई मार्गावरावरुन जाताना व्यवस्थीत रस्ता न दिसल्याने, दुचाकी पुलावरून जोरात खाली कोसळली. जमिनीवर जोराने आदळल्याने ऋतिकचा जागीच मृत्यू झाला. तर वैभव अन सूरज दोघे जण दूर फेकले गेले. दरम्यान, काही वाहन चालकांनी या घटनेची माहिती कळमनुरी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले. तर मृताचाही पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हारुग्णालयात पाठविला.

जिल्ह्यात रोजच अपघाताच्या घटना घडत असल्याने, वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रोज अपघात घडत असल्याने वाहन चालक जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात अतिशय धीम्या गतीने सुरू असलेली रस्त्याची कामे लवकारात लवकर पूर्ण करण्याची मागणी वाहन चालकांनी केली.

हेही वाचा - राज ठाकरे हाजिर हो.. १८ फेब्रुवारीला रांची न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

ABOUT THE AUTHOR

...view details