महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रीय ग्राहक दिनी शासनाकडे रेशन दुकानदारांच्या तक्रारीचा पाऊस

रेशनचा काळा बाजार आणि रेशन दुकानदारांची ग्राहकावरील अरेरावी कमी झालेली नाही. राष्ट्रीय ग्राहक दिनी वसमत तालुक्यातील २५ रेशन दुकानदारांच्या केलेल्या तक्रारीचे तहसीलदार कसे निरसन करतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

hingoli
राष्ट्रीय ग्राहक दिनी शासनाकडे रेशन दुकानदारांच्या तक्रारीचा पाऊस

By

Published : Dec 25, 2019, 12:38 PM IST

हिंगोली -जिल्ह्यात राष्ट्रीय ग्राहक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हिंगोली येथे जनजागृती रॅली काढली, तर वसमत येथे ग्राहकांनी रेशन दुकानदारांच्या तक्रारी प्रशासनाकडे केल्या. २२ ते २८ डिसेंबरपर्यंत ग्राहक जनजागृती सप्ताह म्हणून साजरा केला जाणार आहे. या सप्ताहात ग्राहकाने जागृत होऊन आपल्या हक्काचे आणि कर्तव्याचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जगदिश मणियार यांनी केले.

राष्ट्रीय ग्राहक दिनी शासनाकडे रेशन दुकानदारांच्या तक्रारीचा पाऊस

हेही वाचा -...अन् ही कसली कर्जमाफी; ही तर या सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टाच

जिल्ह्यात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जनजागृती कार्यकर्म पार पडला. ग्राहकांची जर फसवणूक झाली, तर काय करायला हवे यासंदर्भात या कार्यकर्मात मार्गदर्शन केले. तसेच ग्राहकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन, त्या ग्राहकाचे समाधान करणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी जगदीश मणियार यांनी सांगितले. २२ ते २८ डिसेंबर या कालावधीत लोककला व पथनाट्याच्या माध्यमातून ग्राहकांची जनजागृती केली जाणार आहे. तसेच वस्तू व सेवा खरेदी करताना दर्जा, वजनामध्ये होणाऱ्या फसवणूकीपासून सावधानता बाळगण्याचे आणि ग्राहकांच्या जबाबदाऱ्या यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. मात्र, वसमत येथे ग्राहकांनी रेशन दुकांनदाराच्या तक्रारी केल्या आहेत.

हेही वाचा -हिंगोलीत शेकडो रोहित्र दाखल; आमदार बांगर यांनी सभागृहात केली होती मागणी

राष्ट्रीय ग्राहक दिनी वसमत तालुक्यातील २५ रेशन दुकानदारांच्या केलेल्या तक्रारीचे तहसीलदार कसे निरसन करतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. रेशनचा काळा बाजार आणि रेशन दुकानदारांची ग्राहकावरील अरेरावी कमी झालेली नाही. बऱ्याच गावातील लाभार्थी हे रेशनपासून वंचित आहेत. तक्रार करुनही दखल घेतली जात नाही. आता केलेल्या तक्रारी कितपत मार्गी लावल्या जातील, हाही प्रश्नच आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details