हिंगोली जिल्ह्यात सहाव्या दिवशीही पावसाची संततधार कायम - पिकांना जीवदान
हिंगोली जिल्ह्यात सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावासामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र या पावसामुळे जिल्ह्यात नव्याने बनवण्यात येत असलेल्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.
हिंगोली जिल्ह्यात सहाव्या दिवशीही पावसाची संततधार कायम
हिंगोली - जिल्ह्यात पाच ते सहा दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. मागील सहा दिवस सुरू असलेल्या पावासामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र या पावसामुळे जिल्ह्यात नव्याने बनवण्यात येत असलेल्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. तर ज्या भागात रस्तेच नाहीत अशा भागात वाहनचालकांना रस्ता पार करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.