हिंगोली - जिल्ह्याच्या काही भागात सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीट झाली. यामुळे गहू, हरभरा, ज्वारी यासह इतर रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने भांबावलेला शेतकरी आता या नैसर्गिक आपत्तीने अडचणीत सापडला आहे.
हिंगोलीत अवकाळी पाऊस; रब्बी पिकांचे नुकसान - हिंगोली पाऊस
हिंगोलीत मागील दोन दिवसांपासून हजेरी लावत असलेल्या पावसाने शेतीमालाचे अतोनात नुकसान झाले आहे. बुधवारी रात्री झालेल्या पावसाने सेनगाव तालुक्यातील काही भागात गहू आणि ज्वारी शेतातच आडवी पडली आहे.
गारपीट
हेही वाचा -अवकाळी पावसामुळे जळगावातील हजारो हेक्टर क्षेत्राला तडाखा; गहू, हरभरा, केळी पिकाचे मोठे नुकसान
हिंगोलीत मागील दोन दिवसांपासून हजेरी लावत असलेल्या पावसाने शेतीमालाचे अतोनात नुकसान झाले आहे. बुधवारी रात्री झालेल्या पावसाने सेनगाव तालुक्यातील काही भागात गहू आणि ज्वारी शेतातच आडवी पडली आहे. ग्रामीण भागात काही ठिकाणी विद्युत पुरवठादेखील खंडित झाला.