हिंगोली - सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. फक्त आणि फक्त राज्य सरकारच्या दुर्लक्षितपणामुळेच ओबीसी आरक्षण मिळत नाही, असा आरोप राज्याचे विरोधपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. एक दोन नव्हे तर राज्यसरकारने तब्बल 15 महिने झोपा काढल्याने आरक्षण प्रश्न मार्गी लागलेला नसल्याचा आरोपही त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस सद्या हिंगोली जिल्हा दोऱ्यावर असून येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आरक्षणासंदर्भात राज्य सरकारची भूमिका नकारात्मक -
संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण मुद्दा गाजत आहे. राज्य शासनाने तब्बल 15 महिने झोपा काढल्याने आणि राज्य शासन नेहमीच नकारात्मक भूमिका घेतल्याने ओबीसींचा आरक्षण प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे भविष्यात ओबीसी आरक्षणचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. मात्र, ओबीसीला आरक्षण मिळेपर्यंत भारतीय जनता पार्टी ही मोर्चे आंदोलने कायम सुरू ठेवणार असल्याचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना वार्डाला भेट दिली. उपचार घेत असलेल्या रुग्णांसोबत सवांद साधला, उपचारासंदर्भात विचारपूस केली. तसेच वार्डा लगतच नव्याने उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्रकल्पालाही त्यांनी भेट दिली. रुग्णालयात पीएम केअर फंडातून दाखल झालेल्या व्हेंटिलेटर मशीन चांगल्या आहेत. मात्र, ज्या वापरात नसल्याने त्या नादुरुस्त असल्याचे सांगत त्यांनी केंद्र शासनाची पाठराखण केली.
हेही वाचा - कोरोनिल किटवरून रामदेव बाबांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून समन्स