महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'भुजबळ, मुंडे यांनी पक्ष काढला असता तर, मी मुख्यमंत्री म्हणून मेळाव्याला आलो असतो' - hingoli news

OBC Melava Hingoli : हिंगोलीत ओबीसी सभेत महादेव जानकर यांनी आरक्षणावर भाष्य केलंय. छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे यांनी पक्ष काढला असता तर, मी आज हिंगोलीत मुख्यमंत्री म्हणून आलो असतो, असं महादेव जानकर यांनी म्हटलंय. रविवारी हिंगोलीत ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

OBC Meeting at Hingoli
OBC Meeting at Hingoli

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 26, 2023, 4:39 PM IST

हिंगोली OBC Melava Hingoli :हिंगोलीत ओबीसी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक ओबीसी नेते उपस्थित होते. 'छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे यांनी जर पक्ष काढला असता तर मी येथे मुख्यमंत्री म्हणून आलो असतो’, असं वक्तव्य महादेव जानकर यांनी यावेळी बोलताना केलंय. तसंच महादेव जानकर यांनी ओबीसींच्या अनेक मुद्द्यांवर मत व्यक्त केलंय.

ओबीसींमध्ये समावेश करण्यास विरोध : मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. यासाठी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. तसंच त्यांनी महाराष्ट्राचा दौराही सुरू केलाय. 24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढणार, असं सरकारनं म्हटल्याचा दावाही मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. मात्र, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक ओबीसी नेते मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यास विरोध करत आहेत. यावरुन त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण देऊ नये, असं ओबीसी नेत्यांनी म्हटलं आहे. ओबीसींमधून मराठ्यांना आरक्षण देऊ नये म्हणून निषेध व्यक्त करण्यासाठी रविवारी हिंगोलीत भव्य ओबीसी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.

भुजबळ तुम्ही सेनापती व्हा : भुजबळ साहेब तुम्ही सेनापती व्हा, असं देखील महादेव जानकर यांनी म्हटलंय. ज्यांना आमच्या सोबत यायचं ते येतील. आम्ही तुमच्याशी युती करायला तयार आहोत, असंही महादेव जानकर म्हणाले. यावेळी महादेव जानकर यांनी ओबीसींच्या मुद्द्यावरून खडेबोल सुनावले आहेत. आमच्याकडे पैशांची कमतरता नाही. आज छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे एकत्र आले असते, तर ही वेळ आपल्यावर आली नसती, असं विधानही महादेव जानकर यांनी ओबीसी सभेतून केलंय.

दलित, मुस्लिमांना सोबत घ्या : आम्ही सेनापती आहोत. उत्तर प्रदेशात मुलायम सिंह यांनी पक्ष काढला. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा मुख्यमंत्री झाला. त्यामुळं भुजबळांनी पुढच्या वेळी दलित, मुस्लिमांना सोबत घ्यावं, असं जानकर म्हणाले. भुजबळ, मुंडे यांनी जर पक्ष काढला असता तर आम्हाला दुसरीकडं तिकीट मागण्याची वेळ आलीच नसती, असंही जानकर म्हणाले.

हेही वाचा -

  1. गावबंदी संविधानाच्या विरुद्ध, असे बोर्ड लावणाऱ्यांना शिक्षा करा; हिंगोलीमध्ये छगन भुजबळ गरजले
  2. आगामी लोकसभा निवडणूकीत महायुतीतील पक्ष किती जागा लढवणार? देवेंद्र फडणवीसांनी थेट फॉर्म्युलाच सांगितला
  3. 'स्वामीजी का इशारा किसके तरफ हैं? ध्यानसे देखो और समझो'; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

ABOUT THE AUTHOR

...view details