हिंगोली - याही वर्षी स्वच्छतेची परंपरा कायम ठेवण्यासाठी हिंगोली पालिकेने कंबर कसली आहे. शहरात रंगरंगोटी केली असून, आता या अभियानाला शहर वाहतूक शाखेने पाठबळ दिले आहे. या सर्वेक्षणात सहभागी झाल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता वाहनातून रस्त्यावर चिप्स, केळीची सालटी आदी काही फेकून देणे तुमची डोकेदुखी बनणार आहे. संबंधित वाहनावर गुन्हा दाखल केला जाणार आहे.
याहीवर्षी स्वच्छ संरक्षण अभियान
हिंगोली नगरपालिकेत याहीवर्षी स्वच्छ संरक्षण अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. तसा नगरपालिकेने ठराव देखील घेतलेला आहे. त्या अनुषंगाने आता नगरपालिकेत गेल्या काही दिवसांपासून हिंगोली शहरांमध्ये दर्शनीय भागात रंगरंगोटी करण्यात आली आहे. यासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर अजय कुरवाडे यांच्यासह स्वच्छता विभागाची टीम व कर्मचारी स्वतः रात्र दिवस परिश्रम घेत आहे. विशेष म्हणजे नगरसेवकानेदेखील आपल्या भागामध्ये हे सर्वेक्षण राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता हिंगोली शहर हे सध्याच्या स्थितीमध्ये स्वच्छ दिसून येत आहे. याला हातभार म्हणून हिंगोली शहर वाहतूक शाखा काही धावून आली आहे वाहतूक शाखेने या संरक्षणामध्ये सहभाग घेतल्याची घोषणा आज जाहीर केली आहे.