हिंगोली-संपूर्ण जगभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जात आहे. याच जयंतीनिमित्त वेगवेगळे उपक्रम देखील राबवले जात आहेत, अशाच परिस्थितीत कळमनुरी तालुक्यातील कवडा येथील सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालयातील विद्यार्थीनी व कला शिक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची नऊ फुटाची प्रतिमा रांगोळीतून हुबेहूब साकारली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.
सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालयातील कलाशिक्षक दिलीप दारव्हेकर हे नेहमीच आपल्या कलेच्या माध्यमातून वेगवेगळ्या कला रेखाटत चर्चेत राहतात. कोरोना काळात तर दारव्हेकर कुटुंबातील सर्वच सदस्यांनी आगळीवेगळी कलाकृती साकारून कोरोनाचा लॉकडाऊन उपयोगात आणला होता. त्यामुळे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष या कुटुंबाने वेधून घेतले होते. प्रत्येक सण उत्सवा दरम्यान, दारव्हेकर हे रांगोळीतुन कलाकृती सादर करीत असतात. एवढेच नव्हे तर ते टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू देखील बनवतात, उकिरड्यावर वा पडीक जमिनीत उगवणाऱ्या भोपळ्यापासून ते महिला उपयोगी पर्स, घरात शोभेच्या वस्तू बनवतात. त्यामुळे दिलीप दारव्हेकर हे आपल्या कलेने एकट्या हिंगोली जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांनी ही कला कायम ठेवण्यासाठी शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपल्या विद्यार्थ्यांसोबत छत्रपती शिवाजी महाराज यांची पूर्णाकृती प्रतिमा रांगोळी मधून साकारली आहे.
खरी खुरी प्रतिमा असल्याचा होतोय भास -