महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीत 28 कोरोना रुग्णांची वाढ, जिल्ह्याचा आकडा 361वर - corona cases hingoli news

जिल्ह्यात प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकाच दिवशी 28 कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 361वर पोहोचली आहे.

हिंगोलीत नव्याने आढळले 28 कोरोनाबाधित रुग्ण
हिंगोलीत नव्याने आढळले 28 कोरोनाबाधित रुग्ण

By

Published : Jul 14, 2020, 4:37 PM IST

हिंगोली : दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत चाललेली आहे. मात्र, आज (मंगळवार) 28 कोरोनाबाधित आढळल्यामुळे जिल्ह्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पहिल्यांदाच एवढी मोठी रुग्णसंख्या एकाच दिवशी आढळली आहे. आयुक्तांनी हिंगोली येथे दिलेल्या भेटीत कोरोनाची संख्या वाढणार असल्याची शक्यता वर्तवली होती, त्यांचे भाकीत खरे ठरले आहे. आजघडीला जिल्ह्याचा आकडा 361 वर पोहोचला आहे.

नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये हिंगोली शहरातील पेन्शन पुरा भागात गोदावरी हॉटेलजवळील एक रुग्ण आहे. हा रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती आहे. तर, दुसरा व्यक्ती हा औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडा येथील रहिवासी आहे. सध्या या सर्व रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच सेनगाव येथील बसस्थानक परिसरात वास्तव्यास असलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

हिंगोली तालुक्यातील पेडगाव येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 11 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच वसमत येथील कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या तिघांचे देखील अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर, वसमत येथील रेल्वे स्थानक परिसरातील एक अन् पुणे येथून परतलेल्या गणेश पेठ भागातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. तर, मुंबईवरून परतलेल्या देऊळगाव येथील चारजण कोरोनाबाधित निघाले आहेत. तर, पुण्यातून परतलेली एक 24 वर्षीय महिलादेखील कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. औरंगाबाद येथून परतलेले पहेणी येथील दोनजण कोरोना पॉझिटिव्ह अढळले आहेत. तर, मुंबई येथून परतलेल्या माळधामनी येथील एकाचा अहवाल हा कोरोनाबाधित आढळला आहे. तर, सुरत येथून जयपूवाडी येथे परतलेली 45 वर्षीय महिलादेखील कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details