हिंगोली- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊन नंतर आज हिंगोलीत पन्नास दिवसानंतर पहिल्यांदाच मद्य विक्रीची दुकाने सशर्त सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत. त्यानुसार दुकाने उघडली खरे मात्र मद्य प्रेमींची दुकांनाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे हिंगोलीकरांनी दारू सोडली की काय? असा प्रश्न दारु विक्रेत्यांना पडला आहे.
मद्यप्रेमींनी पाठ फिरविल्याने विक्रेत्याना चिंता तब्बल पन्नास दिवसानंतर दुकाने उघडणार असल्याने मद्य विक्रेत्यांनी शासनाने घालून दिलेल्या आदेशाचे पालन करत आज दुकाने उघडली आहेत. विशेष म्हणजे देशी दारू पिणाऱ्यांची सर्वाधिक संख्या असल्याने त्या विक्रेत्यांनी बुधवारपासूनच (दि.13मे) आपल्या दुकानाबाहेर सर्व तयारी केलेली होती. एवढेच नव्हे तर, मध्य प्रेमींची संख्या वाढेल या आशेपोटी दुकानाबाहेर व दुकानात सर्व तयारी केली होती.
प्रशासनाने घालून दिलेले नियम त्याचे पालन करत दुकानात काम करण्यासाठी निरोगी मजुराची देखील निवड केलेली आहे. थर्मल स्क्रिनिंन यंत्र, सॅनिटायझरसह सामाजिक अंतर राहिल या पद्धतीने ग्राहकांना उभारण्यासाठी सोय केली होती. त्याचबरोबर मद्यपरवाना देण्याचीही सोय करण्यात आली होती. मात्र, सकाळपासून केवळ तीन ते चारच ग्राहक दुकानासमोर दिसून आल्याने मद्यविक्री दुकानदारांचा हिरमोड झाला.
देशी दारु पिणाऱ्यांमध्ये मोलमजूरी करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे रोजंदार मजुरांना काम मिळत नाही. यामुळे त्यांचेच दोनवेळच्या जेवणाची भ्रांत झाल्याने दारु पिण्यासाठी पैसे तरी कोठून आणणार, अशी मद्यप्रेमींची स्थिती झाली आहे. मात्र, ग्राहकांच्या आशेपोटी केलेली सर्व तयारी व्यर्थ ठरत असल्याची खंत दारू विक्रेते बाबू कदम व संदीप संघई यांनी व्यक्त केली.
हेही वाचा -हिंगोलीकरांसाठी आनंदाची बातमी; आणखी आठजण कोरोनामुक्त, टाळ्यांच्या गजरात दिला डिस्चार्ज