हिंगोली - जिल्ह्यात गणेशोत्सवासह नवरात्रोत्सव उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हिंगोलीतल्या नवरात्रोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या दसरा महोत्सवात मोठ्या प्रमाणात खेळाचे साहित्य दाखल झाले आहे. साहित्याची जुळवाजुळव सुरू आहे. 165 वर्षाची परंपरा असलेला दसरा महोत्सव म्हैसूर नंतर दुसऱ्या क्रमांकाचा आहे.
हिंगोली येथे नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. जागोजागी दुर्गादेवीची घटस्थापना करण्यात आली आहे. तर हिंगोली शहरात विविध दुर्गा मंडळाच्यावतीने दुर्गा देवीच्या मंदिराची आकर्षक सजावट करणे सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यातील घोटा देवी येथे आज घटस्थापनेच्या दिवशी घोटा देवीची शासकीय पूजा केली जाते. दहा दिवस आरतीसाठी विविध मान्यवर, अधिकारी आवर्जून हजेरी लावतात. घोटा देवी हे जागृत देवस्थान असल्यानचे सांगितले जाते. या देवीच्या दर्शनासाठी इतर जिल्ह्यातुन भाविक हजेरी लावतात.
हेही वाचा - तुळजाभवानी मंदिरात घटस्थापना करून नवरात्र उत्सवास सुरुवात
असे म्हटले जाते की, अनेक वर्षांपूर्वी या ठिकाणी पुजारी म्हणून असलेले विवेकानंद महाराज यांच्या स्वप्नात ही देवी आली होती. तर त्या देवीची मूर्ती एका विहिरीत आढळली होती. ती मूर्ती आणून तिची आजच्या दिवशी स्थापना केली होती. तेव्हापासून या देवीच्या नावानेच गावाची ओळख निर्माण झाली. आज घडीला या देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होत असते.
हेही वाचा - कोल्हापुरात आजपासून शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ
हिंगोली येथे नवरात्रोत्सव म्हणजे पर्वणीच, या दहा दिवसात दसरा उत्सव देखील उत्साहात साजरा केला जातो. यंदाही दसरा महोत्सवात लहान मोठे झोके, वेगवेगळ्या प्रकराचे खेळण्याची दुकाने दाखल झाली आहेत. दहा दिवस हिंगोलीकरांचा आनंद द्विगुणित होतो. दसरा उत्सवात मुख्य आकर्षण असते ते राम लिलेचे अन नंतर रावण दहनाचे. 52 फुटी रावणाच्या दहनानंतर महोत्सवाचा समारोप होतो.
हेही वाचा - 'यंदा नवरात्रोत्सवात टॅटूंची चलती, 'कलम ३७०' सह 'चांद्रयान-२' च्या टॅटूंनी वेधलं लक्ष'