महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औंढा नागनाथ महाविद्यालयात पार पडला राष्ट्रीय वेबिनार - औंढा नागनाथ कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय

औंढा नागनाथ कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात अलिकडेच राष्ट्रीय वेबिनार पार पडले. यामध्ये उच्चशिक्षणासमोरील आजच्या घडीला कोणती आव्हाने आहेत, या विषयी हे राष्ट्रीय वेबिनार होते.

college
नागनाथ महाविद्यालय

By

Published : Jun 1, 2020, 12:08 PM IST

हिंगोली - जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील औंढा नागनाथ कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात अलिकडेच राष्ट्रीय वेबिनार पार पडले. यामध्ये उच्चशिक्षणासमोरील आजच्या घडीला कोणती आव्हाने आहेत, या संदर्भात देश-विदेशातून सहभागी झालेल्या तज्ञ प्राध्यापकांनी मार्गदर्शन केले. या वेबिनारमध्ये जवळपास 860 प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला होता.

उच्चशिक्षणासमोरील सध्याच्या स्थितीमध्ये कोणती आव्हाने आहेत, यावर डॉ. रेणुका मोरे यांनी सखोल मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय यापुढे चालणे कठीण होणार आहे. त्यामुळे प्रत्येक शिक्षकाने आपापल्या अभ्यासक्रमांचे व्हीडिओ तयार करून ते डिजिटल माध्यमावर अपलोड करावेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी हे व्हीडिओ काही सेकंदांमध्ये उपलब्ध होण्यास मदत होईल.

यावेळी डॉ. चमनलाल म्हणाले, येथील शिक्षण प्रणालीमध्ये मूलभूत बदल होणे नितांत गरजेचे आहे. कारण, शिक्षणाच्या खासगीकरणामध्ये गरिबांना उच्च शिक्षण मिळणे हे कठीण होऊ शकते. आज उच्चशिक्षनासमोर सर्वात मोठे आव्हान गुणवत्तेचे आहे.

जगातील दर्जेदार विद्यापीठांमध्ये भारतीय विद्यापीठे अजिबात गणली जात नाहीत. तथापि, येत्या काळामध्ये ही परिस्थिती कशी बदलता येईल, यासंदर्भात प्रत्येकानी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे डॉक्टर स्मिता यांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य एस. बी. बागल, सचिव प्रा. के. एस. शिंदे, उपाध्यक्ष एस. व्ही. जाधव, कोषाध्यक्ष सुदर्शन फुलपगार, मुरलीधरराव मुळे, बाबुराव पवार यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.व्ही.एस.कानवटे यांनी तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. कल्याण कदम यांनी केले. उपक्रमात समन्वयक म्हणून प्रा. डॉ. स्वप्निल आकाशे यांनी काम पाहिले तर प्राध्यापक प्रदीप तोटावार यांनी आभार मानले.

हेही वाचा -हिंगोलीतील सेनगाव परिसरात वाऱ्यासह पावसाची हजेरी; अनेक घरांची पत्रे उडाली

ABOUT THE AUTHOR

...view details