महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाविरुद्धच्या लढाईत आता नागनाथ संस्थानही सरसावले.. मुख्यमंत्री साहय्यता निधीत 21 लाखांची मदत - औंढा नागनाथ संस्थांन

देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ संस्थांनकडून कोरोनाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री साहय्यता निधीत 21 लाख रुपयाचा निधी देण्यात येणार आहे. संस्थान कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Nagnath Sansthan  financed  21 lakh to Chief Minister's Assistance Fund
औंढा नागनाथ संस्थांनकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २१ लाखांची मदत

By

Published : Apr 19, 2020, 1:30 PM IST

हिंगोली - संपूर्ण जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाला हरवण्यासाठी प्रत्येकाने कंबर कसली आहे. या महाभयंकर आजारात प्रत्येकाला पाझर फुटत आहे. या संकटकाळात प्रत्येक दानशूर आता समोर येत आहेत. देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ संस्थांनकडून कोरोनाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री साहय्यता निधीत 21 लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर पाच हजार गरजूंना अन्नधान्याच्या किटचे देखील वाटप केले जाणार आहे. संस्थान पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.

औंढा नागनाथ संस्थांनकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २१ लाखांची मदत
दिवसेंदिवस कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे प्रशासनातर्फे कोरोनाची लागण थांबविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. शिवाय कोरोनामुळे जिथे-जिथे अडकलेल्या परप्रांतीयांना मदतीचा ओघ देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आशा परिस्थितीत आपणही अजिबात कमी राहायचे नाही, असा ठाम निर्णय घेत औंढा नागनाथ संस्थान पुढे आले आहे. शनिवारी झालेल्या बैठकीत संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री साहय्यता निधीत 21 लाख रुपयांचा निधी तर 17 लाख रुपयांच्या खर्चातून गरजवंताना अन्नधान्य किटचे वाटप केले जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. किटमध्ये 5 किलो गव्हाचे पीठ, 1 किलो तूरडाळ, 2 किलो साखर, 5 किलो तांदूळ, 1 किलो तेल, साबण असे साहित्य राहणार आहे.
आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत घेतलेल्या बैठकीस संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार पांडुरंग माचेवाड, पदाधिकारी विद्या पवार, गणेश देशमुख, राम कदम, गजानन वाखरकर, पुरुषोत्तम देव, डॉ. खरात आनंद निलावार साहेबराव देशमुख यांची उपस्थिती होती. आता संस्थांन गरजवंतांच्या मदतीसाठी धावून आल्याने, अनेकांची उपाशी पोटी राहण्याची वेळ टाळण्यासाठी मदत होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details