हिंगोली- संपूर्ण भारतात ठिकठिकाणी सीएए व एनआरसी विरोधात मुस्लीम बांधव आक्रमक झाले आहेत. वेगवेगळ्या संघटनांच्यावतीने उपोषण, आंदोलन करत या कायद्याला विरोध दर्शवला जातो आहे. याच धर्तीवर हिंगोलीतील गांधी चौक येथे 13 जानेवारी पासून मुस्लीम बांधवांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.
हेही वाचा... माझ्याकडे जन्माचा दाखला नाही, ..म्हणजे मी भारतीय नाही का?
सरकारचे आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मुस्लीम युवक वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आहेत. बुधवारी काही तरूणांनी हातात 'हातकड्या' घालून स्वतःला बंदिस्त करून घेत सरकारही असाच अन्याय करत असल्याचा आरोप मुस्लीम बांधवांनी केला.
हेही वाचा... डोळ्यापुढे धूर.. गुदमरणारा श्वास..अन् आक्रोश.. 'झेन'ने सांगितला आगीचा थरार
हिंगोलीतील गांधी चौक येथे एनआरसी आणि सीएएच्या विरोधात मुस्लीम बांधवांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलना दरम्यान मुस्लीम बांधवांकडून रोज आगळ्या वेगळ्या पद्धतीने निदर्शने करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला जातोय. मंगळवारी काही मुस्लीम युवकांनी अंगावर तिरंगा काढत त्यामध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणारे शब्द लिहिले. तर बुधवारी स्वतःला बंदिस्त करून घेत, सरकार देखील मुस्लिम बांधवांना असेच नजरकैदेत ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. गुरूवारी या आंदोलनाचा शेवट दिवस आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेची बैठक घेण्यात येणार आहे. त्यामध्ये पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असे आंदोलकांनी सांगितले.