हिंगोली - रायगड जिल्ह्यातील दापोली येथे लग्नाची मागणी धुडकावून लावल्याच्या कारणावरून गळा चिरून माय-लेकींची हत्या करणाऱ्या खुन्याने हिंगोलीत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. घटनास्थळावरून धूम ठोकून आपल्या पहेनी या गाव शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृताविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.
प्रकाश यशवंता मोरे (रा. पहेनी जि. हिंगोली) असे मृताचे नाव आहे. प्रकाश हा अनेक वर्षांपासून रायगड जिल्ह्यातील दापोली येथे भाड्याची खोली घेऊन वास्तव्यास होता. पत्नीचा बाळंतपणात मृत्यू झाल्याने तो त्याच्याच चाळीत राहत असलेल्या कळमनुरी तालुक्यातील रुपुर येथील सिद्धार्थ बलखंडे यांच्या सुजाता नावाच्या मुलीला लग्नासाठी मागणी घालत होता. मात्र, मुलीचे शिक्षण सुरू असल्याने तिच्या आई-वडिलांनी लग्नाला स्पष्ट विरोध दर्शविला. तरीही प्रकाश काही केल्या ऐकत नव्हता. त्याच्या अधून-मधून धमक्या सुरूच होत्या. त्यामुळे सुजताच्या आईने पनवेल शहर पोलीस ठाणे गाठून प्रकाशविरुद्ध तक्रार दाखल केली होती. यात 107 कलमानुसार गुन्हा ही दाखल झाला होता.
कंटाळून आले होते गावी कुटुंब
प्रकाश या लग्नासाठी एवढा मागे लागला होता की, त्याने बलखंडे कुटुंबाला सळो की पळो करून सोडले होते. तो नेहमीच सुजाताच्या घरी जाऊन तिला लग्नासाठी मागणी घालत असे. त्यामुळे बलखंडे कुटुंब प्रकाशच्या त्रासास कंटाळून आपल्या मूळ गावी रुपुर येथे आले होते. पुन्हा काही दिवसांनी कामानिमित्त ते दापोली येथे स्थायिक झाले तरीदेखील प्रकाशच्या वागण्यामध्ये काहीच बदल झालेला नव्हता.
शेवटी केले काम तमाम