महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीत घरगुती वादातून पतीचा खून - murder in hingoli

हिंगोली शहरातील इंदिरा नगर भागात घरगुती वादातून एकाचा खून झाल्याची घटना, सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. सुनेने तिच्या नातेवाईकांना बोलावून माझ्या मुलाचा खून केल्याचा आरोप मृताच्या आईने केला आहे.

murder in hingoli
हिंगोलीत घरगुती वादातून पतीचा खून

By

Published : Oct 6, 2020, 3:58 PM IST

हिंगोली- शहरातील इंदिरा नगर भागात घरगुती वादातून एकाचा खून झाल्याची घटना, सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. सुनेने तिच्या नातेवाईकांना बोलावून माझ्या मुलाचा खून केल्याचा आरोप मृताच्या आईने केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

शेख शब्बीर शेख (30) असे मृताचे नाव आहे. शब्बीर अन् त्याच्या पत्नीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कडाक्याचे भांडण सुरू होते. लॉकडाऊन काळात तर, हे भांडण एवढे वाढले होते की, शब्बीरला कुठे काम लागले नसल्यामुळे पत्नी सारखी भांडत होती. पतीला खायला देखील देत नव्हती. कित्येकदा तर शब्बीर उपाशीपोटी झोपल्याचे शब्बीरच्या आईने सांगितले.

हिंगोलीत घरगुती वादातून पतीचा खून

या दोन दिवसांमध्ये हा वाद विकोपाला गेला सोमवारी सायंकाळी पत्नीने आपल्या नातेवाईकाला बोलावून घेतले आणि शब्बीरला मारहाण केली. शब्बीर वाचवण्यासाठी विनंती करीत होता, मात्र त्याला वाचविण्यासाठी मारेकरी कोणालाही जवळ येऊ देत नव्हते, असे शब्बीरच्या आईने सांगितले. पोलिसांनी पंचनामा करून, मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details