हिंगोली - शेतात गेलेल्या एका शेतकऱ्याच्या डोक्यात रॉड मारून हत्या केल्याची घटना कळमनुरी तालुक्यातील झरा येथे रविवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सोनाजी दत्तराव तडस (६०) असे, हत्या झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
रक्ताच्या थारोळ्यात पडला होता मृतदेह -
तडस यांच्या शेतात आखाडा उभारणीचे काम सुरू आहे. यासाठी येथे लोखंडी साहित्य व टीनपत्रे आणून ठेवली आहेत. नेहमी प्रमाणे शनिवारी तडस हे शेतात गेले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी बराच वेळ होऊनही ते घरी परतले नाही. त्यामुळे घरच्यांनी शेतात धाव घेतली असता, तडस हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. या घटनेची माहिती कळमनुरी पोलिसांना मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला.