महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'हारकर जितने वालो को बाजीगर कहते है'; हिंगोलीच्या प्रचार बैठकीत आला अनुभव - congress

सातव हे राहुल गांधींचे अतिशय निकटवर्तीय असल्याने अन् गुजरात राज्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांचे असल्यानेही सातव यांना तिकडेच लक्ष घालण्याची जबाबदारी त्यांच्यावर दिल्याचे बोलले जाते.

By

Published : Mar 31, 2019, 11:20 PM IST

हिंगोली -हिंगोली लोकसभा मतदारसंघात गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसने भाजपमधून आयात केलेला उमेदवार सुभाष वानखेडे यांच्या प्रचार बैठकीचे आज (रविवार) हिंगोलीत आयोजन केले होते. त्यावेळी खासदार राजीव सातव हजर झाल्याने त्यांची भेट घेण्यासाठी कार्यकर्ते गर्दी करत होते. मैदानात नसतानाही हिंगोलीत सातव यांना मिळालेला प्रतिसाद पाहून 'हारकर बी जितने वालो को बाजीगर कहते है' असाच काहीसा अनुभव आला.

राजीव सातव यांची हिंगोलीला भेट


या बैठकीला माजी आमदार भाऊराव पाटील-गोरेगावकर यांना निमंत्रण न दिल्याचे त्यांनीच सांगितले. अनेक दिवसांपासून काँग्रेसमध्ये सुरू असलेली अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे स्पष्ट दिसून आले. खासदार सातव यांच्यावर गुजरात राज्याची जबाबदारी असल्याने त्यांनी लोकसभेतून माघार घेतली. विशेष म्हणजे सातव हे राहुल गांधींचे अतिशय निकटवर्तीय असल्याने अन् गुजरात राज्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांचे असल्यानेही सातव यांना तिकडेच लक्ष घालण्याची जबाबदारी त्यांच्यावर दिल्याचे बोलले जाते.
दुसरीकडे मात्र, सातवांचा हिंगोली लोकसभा मतदारसंघात संपर्कही कमी झाला होता. त्यामुळेच की, काय सातव यांनी माघार घेतल्याचे बोलले जात आहे. परंतु, या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून कोणता सक्षम उमेदवार ही दिसून आला नाही. त्यामुळेच काँग्रेसच्या आजी-माजींना विश्वासात घेत भाजपमधून सुभाष वानखेडे यांना आयात करत निवड केली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशीच महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सुभाष वानखेडे यांनी मोदींच्या विविध योजना सांगत अन शिवसेनेत कार्यकर्त्यांना होणारा त्रास सांगून उपस्थितांना हसविले होते. या मेळाव्यात राजीव सातव नसल्याने त्यांच्या अनुपस्थितीचे वेगवेगळे राजकीय अर्थ लावले जात होते.
उमेदवारी घोषित झाल्याने राजीव सातव समर्थकात नाराजीचा सूर उमटला होता. मात्र, वानखेडे यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी आयोजित केलेल्या बैठकीस राजीव सातव हजर झाले होते. त्यांच्या वाहनाचा नांदेडपासून एवढा मोठा ताफा होता की, सातव याना त्यांचे समर्थक जराही बोलण्याचा प्रयत्न करीत असताना, मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत होत होती. आघाडा बाळापूर या ठिकाणी अक्षरशः वाहतूक ठप्प झाली होती. एक तासाच्या अंतराला जवळपास दीड ते दोन तास लागले होते.
सुभाष वानखेडे यांना तिकीट मिळून देण्यासाठी सर्वाधिक जास्त प्रयत्न करणारे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनाच निमंत्रण न दिल्याने आता याची देखील उलट सुलट चर्चा रंगत आहे. एवढेच नव्हे तर पाटील यांच्या समर्थकात नाराजी पसरली आहे. निवडणुकीच्या तोंडावर जोरदार घडामोडी सुरू असल्या तरी, आशा परिस्थितीत खासदार सातव हिंगोलीत आल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी पाहून सातव जिंकल्यासारखेच चित्र पहावयास मिळाले. त्यामुळे एका चित्रपटातील अभिनेत्याचा डायलॉग आठवण करून देत होता.

ABOUT THE AUTHOR

...view details