महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खासदार हेमंत पाटलांचे 'ते' पत्र बनावट; व्हायरल करणाऱ्यावर कारवाईची मागणी - mp hemant patil on caa

मोर्चाला हजर न राहू शकणारे खासदार हेमंत पाटील यांच्या स्वाक्षरीचे पत्र त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी मोर्चातील संयोजकांना देत व्हॉटसअॅपवर व्हायरल केले होते. मात्र, आपण असे कोणतेही पत्र दिले नसून ते खोटे पत्र होते. ते व्हायरल करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी खासदारांनी एका पत्राद्वारे हिंगोली शहर पोलीस ठाण्यात केली आहे.

letter
पत्र व्हायरल

By

Published : Dec 27, 2019, 1:44 PM IST

Updated : Dec 27, 2019, 2:54 PM IST

हिंगोली- येथे 24 डिसेंबरला सर्वधर्मीयांच्यावतीने नागरिकत्व कायद्याच्या समर्थनात मूक मोर्चा काढला होता. यामध्ये मोठ्या संख्येने विविध संघटना, नागरिक सहभागी झाले होते. मात्र, मोर्चाला हजर न राहू शकणारे खासदार हेमंत पाटील यांच्या स्वाक्षरीचे पत्र त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी मोर्चातील संयोजकांना देत व्हॉटसअॅपवर व्हायरल केले होते. मात्र, आपण असे कोणतेही पत्र दिले नसून ते खोटे पत्र होते. ते व्हायरल करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी खासदारांनी एका पत्राद्वारे हिंगोली शहर पोलीस ठाण्यात केली आहे. आता शहर पोलीस पत्र व्हायरल करणाऱ्यांचा शोध घेत आहेत.

खासदार हेमंत पाटलांचे 'ते' पत्र बनावट

हेही वाचा -हजारो महिला आझाद मैदानावर दाखल; जनवादी महिला संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन गाजणार

संसदेत मंजूर करण्यात आलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनासाठी संपूर्ण महाराष्ट्रात मोर्चे काढण्यात आले होते. त्याच धर्तीवर हिंगोली येथे सर्वधर्मीयांच्यावतीने 24 डिसेंबरला नागरिकत्व कायद्याच्या समर्थनात मोर्चा काढला होता. मात्र, या मोर्चाला शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील हे उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांचे पत्र त्यांच्याजवळील कार्यकर्त्यांनी मोर्चाच्या संयोजकांना दिले होते. एवढेच नव्हे तर या पत्राद्वारे मोर्चाला उपस्थित नसल्याची खंत देखील खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केली होती.

पत्र

शिवसेना ही आधीपासूनच हिंदुत्ववादी पक्ष राहिलेला आहे, व त्यासाठी सातत्याने शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतलेली आहे. या कायद्यास माझे पूर्णपणे समर्थन असल्याने हे मी पत्र देत असल्याचे पत्रात स्पष्ट केले होते. त्यानंतर हे पत्र व्हॉट्सअॅपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. यावरून खासदार पाटील यांचा या मोर्चाला पाठिंबा असल्याचे स्पष्ट दिसून आले होते. मात्र, मोर्चाच्या दुसऱ्याच दिवशी खासदारांचे दुसरे पत्र हिंगोली शहर पोलीस ठाण्यात आले. त्यानंतर व्हायरल झालेले पत्र खोटे असल्याची तक्रार दाखल केली. खोटे पत्र व्हायरल करणार्‍यावर कडक कारवाई करण्याची मागणी खासदार पाटील यांनी केली.

खासदारांच्या पत्राचा गैरवापर कुणी केला? याचा शोध पोलीस घेत आहेत. व्हायरल झालेल्या पत्राची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

Last Updated : Dec 27, 2019, 2:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details