हिंगोली :आई ही खरोखरच आई असते. ती आपल्या बाळाला मृत्यूच्या दाढेतून (mother monkey saves her puppy from jaws of death) काढण्यासाठी नको ते प्रयत्न करत असते, वेळ पडली तर स्वतःचा जीव देखील गमावण्यासाठी आई अजिबात मागेपुढे पाहत नाही. याचेच दर्शन सेनगाव तालुक्यातील केंद्रा बुद्रुक (power plant in Hingoli) येथे घडले.
खेळत बागडत असताना विद्युत प्रवाह सुरू असलेल्या ताराल स्पर्श होऊ वानरीचे पिलू थेट रोहित्रावर (power plant in Hingoli) आदळले. पिलू जोर जोरात किंचाळत होते. तोच काही वेळात त्या ठिकाणी वानरांचा थाफा दाखल झाला, निपचित पडलेल्या पिलाला वाचवण्याची कुणाची हिंमत होत नव्हती. अन पिलू देखील ओरडून ओरडून हिर्मुसुन गेले होते. बघ्यांना ही वाटले की, आता या वानराच्या पिल्ल्याने निरोप घेतला. मात्र, त्या वानर पिल्लाच्या आईने अजिबात वेळ वाया न जाऊ देता आणि जीवाची जराही परवा न करता आपल्या पिलाच्या किंचाळलेल्या आवाजाकडे धाव घेऊन रोहित्रा वरून अलगत आपल्या पिलाला हळूच जवळ ओढून घेतले, आणि पिल्लूही आईच्या कुशीत आल्यानंतर शांत झाले. आईच्या कुशीत आल्यावर त्याला एवढे बरे वाटले की, ते आपल्या साथीदाराकडे टकमक पाहत होते. हा भयंकर क्षण परिसरात असलेल्या काही नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केला. यातूनच आईच्या वात्सल्याचे दर्शन दिसून आले. खरोखरच आई ही आई असते, हे या विदारक क्षणावरून पुन्हा एकदा दिसुन आले. त्यानंतर त्या ठिकाणी दाखल झालेल्या वानरसेनेने आई व पिलाला सोबत घेऊन तिथून त्यांनी पळ काढला.
Mother Monkey Saves Her Puppy : वात्सल्याचे दर्शन, मृत्युच्या जबड्यातून वाचविले आपल्या वानराने वाचविले पिल्लाचे प्राण
एखाद्या चित्रपटाला शोभेल असाच काहीसा क्षण, सेनगाव तालुक्यातील केंद्रा बुद्रुक (power plant in Hingoli) येथे नागरिकांनी अनुभवला. रोहित्रावर आदळलेल्या आपल्या पिलाला वानर आईने आपल्या जिवाची पर्वा न करता, मृत्यूच्या दाढेतून (mother monkey saves her puppy from jaws of death) बाहेर काढले. दरम्यान आईच्या वात्सल्याचे दर्शन उपस्थितांनी अऩुभवले.
वानर आईच्या वात्सल्याचे दर्शन
एखाद्या चित्रपटाला शोभेल असाच काहीसा क्षण, या ठिकाणी नागरिकांच्या अनुभवास आला. आतापर्यंत आपण एखाद्या चित्रपटांमध्ये आई आपल्या मुलाला वाचवण्यासाठी कसे प्रयत्न करते, हे अति बारकाईने दाखविले जात आसल्याचे पाहत आलोय. परंतु, या ठिकाणी खरोखरच हा क्षण नागरिकांनी पाहिला आणि या प्राणीमात्रावरून आईच्या ममत्वाचे दर्शन झाले आहे.