हिंगोली - जुन्या मोबाईलच्या फुगलेल्या बॅटरीसोबत खेळणे एका चिमुरड्याला महागात पडले आहे. आठ वर्षाचा मुलगा फुगलेली बॅटरी दगडाने ठेचून सरळ करण्याचा प्रयत्न करत होता. अशातच बॅटरीचा स्फोट झाला अन् चिमुरड्याचे दोन्ही हातांच्या चिंधड्या झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. संबंधित घटनेत मुलाचे दोन्ही हात निकामी झाले असून त्याच्यावर नांदेडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोबाईल बॅटरी फुटून अपघात झाल्याची ही जिल्ह्यातील दुसरी घटना आहे. याआधीचा प्रकार चार महिन्यांपूर्वी वसमत तालुक्यात समोर आला होता.
मोबाईल बॅटरीचा स्फोट होऊन हाताच्या झाल्या चिंधड्या.. - hingoli latest news
जुन्या मोबाईलच्या फुगलेल्या बॅटरीसोबत खेळणे एका चिमुरड्याला महागात पडले आहे. आठ वर्षाचा मुलगा फुगलेली बॅटरी दगडाने ठेचून सरळ करण्याचा प्रयत्न करत होता. अशातच बॅटरीचा स्फोट झाला अन चिमुरड्याचे दोन्ही हातांच्या चिंधड्या झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली.
मोबाईल बॅटरीचा स्फोट होऊन हाताच्या झाल्या चिंधड्या..
या प्रकारानंतर घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी जमली. अशोकला तातडीने औंढा नागनाथ येथील ग्रामीण आरोग्य रुग्णालयात हालवण्यात आले. मात्र, परिस्थिती गंभीर असल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. या ठिकाणी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हालवण्यात आले आहे.
त्याच्या दोन्ही हातांच्या दोन-दोन बोटाचे तुकडे झाले आहेत. तर पंजे निकामी झाले आहेत.