महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी महसूल राज्यमंत्री हिंगोलीत दाखल - Abdul Sattar in Gram Panchayat election campaign

हिंगोलीत ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी महसूल राज्यमंत्री दाखल झाले आहेत. उब्दुल सत्तार यांनी बळसोड ग्रामपंचायतीसाठी प्रचार केला.

minister-of-state-for-revenue-hingoli-filed-for-gram-panchayat-election-campaign
ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी महसूल राज्यमंत्री मंत्री हिंगोलीत दाखल

By

Published : Jan 12, 2021, 4:47 PM IST

Updated : Jan 12, 2021, 5:03 PM IST

हिंगोली-आता पर्यंत आमदार, खासदार यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आपापल्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी मंत्र्यांच्या सभा झाल्याचे पाहत आलोय, आता मात्र ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रिंगणात उभे असलेल्या उमेदवारांसाठीही आता मंत्री प्रचार सभेस दाखल होत असल्याचे हिंगोली येथे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या झालेल्या प्रचार सभेतून दिसले आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी महसूल राज्यमंत्री हिंगोलीत दाखल

हिंगोली शहराला लागून आलेल्या बळसोंड ग्रामपंचायतीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. या ग्रामपंचायतीच्या व निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज आपली प्राण प्रतिष्ठा पणाला लावून कामाला लागले आहे. शहरा जवळ असलेली ग्रामपंचायत असल्याने, या ग्रामपंचायतिचे उत्पन्न सर्वाधिक आहे. त्यामुळेचे आपली सत्ता या ग्रामपंचायतीत कशी राहील यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत आहे. या निवडणुकीत शिवसेनेतर्फे नशीब अजमावणाऱ्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची बळसोंड ग्रामपंचायत हद्दीत सभा पार पडली. सभेत मोठया संख्येने मतदार व कार्यकर्ते अन मुख्य आलेले उमेदवार उपस्थित होते.

नगरांच्या नावावर स्तुती सुमने -

बळसोंड ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या विविध नगरांना देण्यात आलेल्या धार्मिक नावा मुळे मंत्री अब्दुल सत्तार हे भारावून गेले. असे वेगवेगळे धार्मिक नावे संबंध टिकवले आहेत आणि हे संबंध टिकविण्याचे काम माननीय उद्धवजी ठाकरे हे आजही करत आहेत. यापूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कोणताही मंत्री आलेला नाही. मात्र, उद्धव ठाकरे यांनी हा पहिला प्रयोग केलेला आल्याचे सांगत ग्रामीण भागामध्ये तुम्ही दौरे करा मंत्री हे मुंबईमध्ये बसण्यासाठी नव्हे तर प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जाण्यासाठी आहेत. हाच एक वसा घेऊन आम्ही याठिकाणी आल्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

विकास कामासह पाण्याच्या मुद्द्यावर टाकला प्रकाश

बनसोड ग्रामपंचायती हद्दीमध्ये एक वर्षापासून पाण्याचा प्रश्न हा गंभीर बनलेला आहे. मात्र, तो पाण्याचा प्रश्न या निवडणुकीत नंतर सोडण्यात येणार असल्याचे आश्वासन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जाहीर सभेमध्ये दिले आहे. दारू विकणारा देखील या निवडणूक रिंगणात असल्याची टीका त्यांनी यावेळी विरोधकावर केली. आता खरोखरच पाण्याचा प्रश्न या निवडणुकीनंतर सुटणार का याकडे बसून ग्रामस्थ व शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Last Updated : Jan 12, 2021, 5:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details