हिंगोली- दिवाळीचा आनंद द्विगुणित करणाऱ्या झेंडूच्या फुलाचे उत्पादन यावर्षी वाढले असले तरीही, तीन ते चार दिवसांपासून झालेल्या सततच्या पावसाने झेंडूचे नुकसान झाले आहे. पावसाचा फटका बसलेल्या फुलांचा बाजारभाव पडल्याने खराब झालेली फुले फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तसेच सोयाबीनला पावसामुळे अंकुर फुटल्याने हे पीक वाया गेले आहे.
ऐन दिवाळीत झेंडूची फुले रस्त्यावर; सोयाबीनला फुटले अंकुर - hingoli marigold flowers news
दिवाळीचा आनंद द्विगुणित करणाऱ्या झेंडूच्या फुलाचे क्षेत्र यावर्षी वाढले असले तरीही, तीन ते चार दिवसांपासून झालेल्या सततच्या पावसाने झेंडूचे नुकसान झाले आहे. पावसाचा फटका बसलेल्या फुलांचा बाजारभाव पडल्याने खराब झालेली फुले फेकून देण्याची वेळ शेतकऱयांवर आली आहे.
झेंडूच्या फुलाचे क्षेत्र यावर्षी वाढले असले तरीही, तीन ते चार दिवसांपासून झालेल्या सततच्या पावसाने झेंडूचे नुकसान झाले
यावर्षी खरिपाच्या पेरण्यांपासूनच पावसाने हजेरी लावलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. परंतु, परतीचा पाऊस लांबल्याने सोयाबीन व कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच बजारात विक्री होणारी फुले पावसात भिजल्याने शेतकऱ्यांवर रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे.
दिवाळीच्या तोंडावर प्राशासनाने नुकसान झाल्याचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.