महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीत मंडळ अधिकारी 30 हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात - hingoli latest crime news

कळमनुरी तालुक्यात रात्री-अपरात्री मोठ्या प्रमाणात वाळूची चोरटी वाहतूक सुरू आहे. महसूल व पोलीस प्रशासनाकडून चोरटी वाहतूक करणारे वाहने जप्त करण्याचा सपाटा लावला आहे. मात्र, डाखोरे या मंडळ अधिकाऱ्यांनी वाळूची वाहतूक करताना आढळलेल्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडे तीस हजार रुपयाची लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराची इच्छा नसल्याने त्याने थेट हिंगोली येथील लाचलुचपत कार्यालय गाठून संबंधित मंडळ अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार दिली.

mandal officer grabbed redhand accepting bribe rs 30000 in hingoli
हिंगोलीत मंडल अधिकारी 30 हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

By

Published : Jun 8, 2020, 8:17 PM IST

Updated : Jun 8, 2020, 8:31 PM IST

हिंगोली - चोरट्या मार्गाने वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना कळमनुरी येथील बसस्थानक परिसरात मंडळ अधिकारी व त्याच्या सहकाऱ्यास लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईने महसूल कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. कोरोना सारख्या महाभयंकर परिस्थितीत प्रत्येक विभागांतील अधिकारी कर्मचारी चोख भूमिका बजावत आहेत. मात्र, आशा काही कर्मचाऱ्यांमुळे कार्यालयाची मोठी बदनामी होत आहे. उत्तम डाखोरे असे लाच स्वीकारणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याचे तर सुनिल नागोराव शिंदे असे त्याच्या सहकाऱ्याचे नाव आहे.

हिंगोलीत मंडल अधिकारी 30 हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

कळमनुरी तालुक्यात रात्री-अपरात्री मोठ्या प्रमाणात वाळूची चोरटी वाहतूक सुरू आहे. महसूल व पोलीस प्रशासनाकडून चोरटी वाहतूक करणारे वाहने जप्त करण्याचा सपाटा लावला आहे. मात्र, डाखोरे या मंडळ अधिकाऱ्यांनी वाळूची वाहतूक करताना आढळलेल्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडे तीस हजार रुपयाची लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराची इच्छा नसल्याने त्याने थेट हिंगोली येथील लाचलुचपत कार्यालय गाठून संबंधित मंडळ अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार लाचलुचपत विभागाकडून सदरील तक्रारीची पडताळणी केली असता, त्यामध्ये मंडळ अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीस अधिक्षिका कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधिक्षिका अर्चना पाटील, पोलीस उपअधीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख या कर्मचाऱ्यांनी सापळा रचून मंडळ अधिकार्‍यास तीस हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईने संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. लाच स्वीकारणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याविरुद्ध कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Last Updated : Jun 8, 2020, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details