हिंगोली - जिल्ह्यातील कापूरखेडा येथील पैनगंगा नदीवर पोहण्यासाठी गेलेला एकजण पाण्यात बुडुन बेपत्ता झाल्याची घटना घडली. शंकर भोयर असे बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे नाव असून रविवार सकाळपासून त्यांचा शोध घेणे सुरू आहे. मात्र अजूनही भोयर यांचा शोध लागला नसल्याने बचाव पथक येत असल्याचे उपस्थित अधिकारी कर्मचारी सांगत आहे. तर, कट्ट्यावर बघ्यांची मोठ्याप्रमाणात गर्दी झाली आहे.
पैनगंगा नदीवर पोहण्यासाठी गेलेला एकजण गेला वाहून, शोधकार्य सुरू - painganga river
जिल्ह्यातील कापूरखेडा येथील पैनगंगा नदीवर पोहण्यासाठी गेलेला एकजण पाण्यात बुडुन बेपत्ता झाला. रविवार सकाळपासून सध्या ग्रामस्थच त्यांचा शोध घेत असून 10 तास उलटूनही शोध लागलेला नाही.
देवठाणा (भोयर) येथील शंकर भोयर हे आपल्या मित्रासमवेत कापूरखेडा येथून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर पोहण्यास गेले होते. त्यांनी नदीत उडी मारली मात्र ते बाहेर निघालेच नाहीत तेव्हापासून आतापर्यंत त्यांचा शोध घेतला जात आहे. तर, वाशिम आणि हिंगोली येथील बचाव पथक येणार असल्याचे घटनास्थळी बोलले जात आहे. सध्या ग्रामस्थच त्यांचा शोध घेत असून 10 तास उलटूनही शोध लागलेला नाही. कट्ट्यावर मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाली आहे. घटनास्थळी उपस्थीत तहसीलदार गजानन शिंदे इकडून पथक येत आहे, तिकडून येत असल्याचे ग्रामस्थांना सांगत आहेत. तर, ग्रामिण चे पोलीस अंगद सुडके यांच्यासह पोलिसांचा फौज फाटा घटनास्थळी तैनात आहे.
हेही वाचा - हिंगोलीत खडीच्या ढिगाऱ्याखाली गुदमरून एकाचा मृत्यू