हिंगोली - भानामती केल्याच्या संशयातून एकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील पारडा येथे घडली आहे. याप्रकरणी, बासंबा पोलीस ठाण्यात 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर साधू आलझेंडे (वय 55), असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर, विकास गोविंदपुरे, संतोष तोरकड आणि सिद्धेश्वर तोरकड अशी आरोपींची नावे आहेत.
आरोपींनी शंकर यांना शिवीगाळ करून 'तू करणी, कवटाळ, भानामती, जादूटोणा करतोस' असे म्हणत जबरदस्तीने ऑटोमध्ये बसवले. गावापासून काही अंतरावर नेवून बेदम मारहाण करत त्यांची हत्या केली. घटनेची माहिती मिळतात बासंबा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. संतोष मारोती आलझेंडे यांच्या तक्रीरीनंतर तीनही आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.