हिंगोली- पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पारधीवाड्यात जुन्या वादातून चाकूने भोसकून खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मृताची पत्नी निशा सुनील चव्हाण यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात 9 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपींचा पोलीस प्रशासनाकडून शोध घेतला जात आहे.
पारधीवाड्यात तरुणाला भोसकले, 9 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल - जुन्या वादातून भोसकून खून
पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पारधीवाड्यात जुन्या वादातून चाकूने भोसकून खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मृताची पत्नी निशा सुनील चव्हाण यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात 9 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

अजेश ऊर्फ अजय बन्सी चव्हाण, ऋतिक भारत चव्हाण, अर्जुन बबन काळे, राहुल संजय काळे, सुनील पुंजाजी चव्हाण, सचिन पवार, शिवाजी चव्हाण, पिंकी चव्हाण, शोभाबाई काळे अशी आरोपींची नावे आहेत. जुन्या भांडणावरून या सर्वांनी गुरुवारी रात्रीसुनील चव्हाण यालाशिवीगाळ केली होती. त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. पाच आरोपींनी खंजीर, तलवार व चाकूने सुनील चव्हाण यास भोसकले. त्याला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून सुनील चव्हाण यांना मृत घोषित केले. पोलीस घटनास्थळी पोहचण्यापूर्वीच आरोपी फरार झाले होते.