हिंगोली -जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरूच असून नांदेड-हिंगोली राज्य महामार्गावरील भाटेगाव शिवारात एकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास थोरात यांनी धाव घेतली. जलबा हरिभाऊ गिरबीडे (रा. हस्तरा, ता. हदगाव) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
नांदेड-हिंगोली राज्य महामार्गावर नेहमीच अपघाताच्या घटना घडत असतात. गिरबीडे हे रस्त्याच्या कडेला मृत अवस्थेत आढळले. मात्र, त्यांच्याजवळ कोणतेही वाहन नव्हते. त्यामुळे ते पायी चालत असावेत, अशी शंका व्यक्त केली जात आहे. त्यांचा मृतदेह डोंगरकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आला. गिरबीडे यांच्या खिशात सापडलेल्या संपर्क क्रमांकावरून त्यांच्या नातेवाईकांना कळविण्यात आले.