हिंगोली -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर 14 मे पासून दारू विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. वाईन शॉपसमोर मद्यप्रेमींची दारू घेण्यासाठी लांबलचक रांग लागत आहे, अशाच परिस्थितीत चक्क महिलाही दारू घेण्याच्या रांगेत उभे राहिल्याचे पाहून सर्वच जण आवाक झाले. त्यांना कोणी विचारण्याचे धाडस केले नाही, मात्र पोलिसांना मिळालेल्या उत्तराने सर्वच जण चक्रावून गेले. महिला म्हणतात, की पुरुषच दारू पिणार का, आम्हाला नको, मग आम्हाला ही परवाना द्या.
चक्क महिला म्हणतात आम्हालाही दारू पिण्याचा परवाना द्या.. दारू खरेदीसाठी महिलांच्याही लांबच लांब रांगा
पुरुषांच्या तुलनेत महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत. आता दारूचे पिणेही महिलांसाठी वर्ज्य नसल्याचे हिंगोलीत दिसून आले. शहरात दारू विक्री दुकानांसमोर पुरुषांच्या बरोबर महिलांच्याही दारू खरेदीसाठी लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. महिलांचे म्हणणे आहे, की पुरुषच फक्त दारू पिणार का, आम्हाला नको, मग आम्हाला ही परवाना द्या..
परंतु सर्वच जण चांगलेच चक्राऊन गेले होते, शेवटी बंदोबस्तासाठी तैनात एका पोलीस कर्मचाऱ्याने त्या महिलांना विचारण्याचा प्रयत्न केला. तर महिलांनी दिलेल्या उत्तराने सर्वजण चक्रावून गेले. महिला म्हणतात की, पुरुष मंडळी दारू पिऊ शकतात, तर मग आम्ही का नाही. आम्हालाही दारू पिण्यास परवानगी द्यावी. जो पर्यंत दारू विक्री असेल तोपर्यंत आम्ही दारूच्या रांगेत थांबून दारू खरेदी करण्यासाठी थांबणारच. शासनाने आम्हालाही आता दारू पिण्याचा परवाना द्यावा, अशी विनंती या महिला करीत होत्या. जोपर्यंत दारूविक्री सुरू होती, तोपर्यंत या महिला उभ्या होत्या.
एवढेच नव्हे तर सध्याच्या विदारक परिस्थिती मध्ये घरात काहीही नसताना देखील आमचे पतिराज दारू खरेदी करण्यासाठी जिवाचे रान करीत आहेत. पोलीस या महिलांना बाहेर काढण्यासाठी विनंती करत होते मात्र; महिला अजिबात त्यांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. दुपारी एक वाजेपर्यंत दुकान बंद होईपर्यंत त्या महिला रांगेमध्ये उभ्या होत्या. मात्र शेवटपर्यंत कोणासाठी दारू खरेदी करत होत्या, हे कळू शकले नाही.