LIVE UPDATES -
- सा 7.20 - शिवसेनेचे हेमंत पाटील विजयी झाले आहे.
- दु. ४.३२ - हेमंत पाटील १ लाख ३७ हजार २८ मतांनी आघाडी
- दु. ४.०० वा. - माझा विजय निश्चित, हेमंत पाटलांचा विश्वास
- दु. ३.३० वा. - हेमंत पाटील १ लाख २१ हजार ३३५ मतांनी आघाडीवर
- दु. ३.११ वा. - सहाव्या फेरीत हेमंत पाटील यांना २१ हजार ६१० मते, सुभाष वानखेडे १४ हजार ७८१ आणि मोहन राठोड यांना ५ हजार ४८२ मते पडलेली आहेत.
- दु. ३.१७ वा. - हेमंत पाटील आघाडीवर असले तरी निवडून मीच येणार, काँग्रेस उमेदवार सुभाष वानखेडे यांचा दावा
- दु. १.२२ वा. - हेमंत पाटील ५७ हजार मतांनी आघाडीवर
- दु. १२.४२ वा. - मतमोजणीला विलंब होतोय.
- स. १०.०८ वा. - हेमंत पाटील यांना २२ हजार ५०, सुभाष वानखेडे यांना १००२४, तर वंचित आघाडीच्या राठोड यांना ७८७८ मते पडलेली आहेत.
- स. ९.३७ वा. - महायुतीचे हेमंत पाटील आघाडीवर
- स. ९.०२ वा. - वंचितांचा आम्हाला पाठिंबा. त्यामुळे आम्ही विजयी होणार, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोहन राठोड यांनी व्यक्त केला, तर जनतेचा शिवसेनेला पाठिंबा असल्याने एनडीएचा विजय निश्चित असल्याचे युतीचे उमेदवार हेमंत पाटील म्हणाले.
- स. ८.०० वा. -मतमोजणीला सुरुवात
- स. ७.२७ वा. - हेमंत पाटील यांचे मतमोजणी केंद्रावर आगमन. निवडणूक निकाल लागण्यापूर्वीच आमचा निकाल आम्हाला माहीत असल्याचे म्हणाले.
हिंगोली - हिंगोली लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? हे आज स्पष्ट होणार आहे. यासाठी शहरातील एमआयडीसी परिसरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या मतदारसंघातून शिवसेनेमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले सुभाष वानखेडे रिंगणात होते, तर महायुतीकडून शिवसेनेचे नांदेड दक्षीणचे आमदार हेमंत पाटील मैदानात उतरले होते. मात्र, आता हिंगोलीची जनता त्यांच्या विकासासाठी कुणाला दिल्लीत पाठवणार? हे आज स्पष्ट होणार आहे.